Breaking
महाराष्ट्रसामाजिक

अंधत्वाकडुन दृष्टिकडे मुक्त अभियान “जुन २०१६ पासुन अखंड सेवा .

0 1 4 7 2 9

अंधत्वाकडुन दृष्टिकडे मुक्त अभियान
“जुन २०१६ पासुन अखंड सेवा “
पाटस (प्रतिनिधी)दि. २३ . नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ पाटस येथे जुन २०१६ पासुन प्रत्येक महिन्यांत २० तारखेस मोफत मोतीबिंदु निदान शिबीर नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ पाटस व के.के.आय इन्स्टिटय़ूट साधुवासवानी मिशन संचलित बुधराणी हॉस्पिटल कोरेगांव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले जाते.दिनांक २० ऑक्टोबर रविवार रोजी मोफत मोतीबिंदु निदान शिबीरात एकुण ६२रूग्णांची तपासणी करून ३२ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. २ रूग्ण हॉस्पिटला रेफर करण्यात आले.दिनांक:-२२ ऑक्टोबर २०२४ रोजी २१ रूग्ण शस्त्रक्रियेसाठी बुधराणी हॉस्पिटल कोरेगांव पार्क पुणें येथे पाठविण्यात आले.तसेंच १२ रूग्णांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले.आजतागायत ऑक्टोबर २०२४ अखेर ७८७७ रूग्णांची तपासणी करून ५२३६ रुग्णांवर उत्तम प्रकारे .मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या.तसेंच २६४७ रुग्णांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले.अंधत्वाकडुुन द्रुष्टीकडे मोतीबिंदु मुक्त अभियान हा प्रकल्प राबविण्याचा संंघटनेच्या माध्यमातून मानस आहे.मोफत मोतिबिंदु निदान शिबीरात श्री.पाटील साहेब,श्री.गाढवे साहेब बुधराणी हॉस्पिटल कोरेगांव पार्क पुणें यांचे सहकार्य लाभले.सदर प्रसंगी नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ पाटसचे संस्थापक अध्यक्ष:-नेत्रमित्र डाॅ.पांडुरंग श्रीपतराव लाड. हे उपस्थित होते. विभागीय उपसंपादक प्रमोद जी शितोळे ऍक्टिव्ह मराठी न्यूज. पाटस. पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे