सादलगांव ता.शिरूर जि.पुणे स्त्रिशक्तीचा आदर एक आगळा वेगळा उपक्रम
विभागीय संपादिका दिपाली दिवेकर ॲक्टिव्ह मराठी न्यूज. शिरूर. पुणे

सादलगांव ता.शिरूर जि.पुणे स्त्रिशक्तीचा आदर एक आगळा वेगळा उपक्रम
शिरूर (प्रतिनिधी) दिनांक 4 जानेवारी .पुणे जि ग्रामीण विभागीय संपादिका
दिपाली दिवेकर.
सादलगांव ता शिरूर जि पुणे येथे जगताप परिवारातील अरुण जगताप व प्रभा जगताप या उभयतांच्या वैवाहिक सहजीवनाला शुक्रवार ३ जानेवारी २०२५ रोजी २५ वर्ष पुर्ण झाली तसेच देशातील पहिल्या शिक्षिका , स्त्रिशक्तीच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती , महिला मुक्ती दिन या सर्वांचा सुवर्ण योग साधून अरुण जगताप यांनी कसलाही हुंडा न घेता पत्नी प्रभा यांच्या बरोबर पुनर्विवाह करुण हुंडाबंदी प्रबोधन तसेच स्त्रिशक्तीचा जागर आदर सन्मान केला . साखरपुडा , हळद , नवरदेव परण्या , वर ओवाळणी , मंगलअष्टका , कन्यादान व सप्तपदी अशा प्रकारे हा विवाह हिंदू धर्म संस्कृती प्रमाणे ब्राम्हण काका राहूल पंत देशमाने यांच्या साक्षीने पार पडला . यावेळी उपसरपंच दिपक केसवड , मा तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पवार, हभप केतन महाराज केसवड यांनी वधू वरांना शुभेच्छा दिल्या . तसेच या सोहळ्याचे सुत्रसंचालन रामदास आडसुळ व मोहन जगताप यांनी केले . लग्नसोहळ्यासाठी फोटोग्राफर शुभम ढवळे यांनी चांगली भुमिका पार पाडली . या विवाहासाठी वधु वरांचा मुलगा संदेश , तीन मुली , जावई , नातवंडे , बहिणी , भाचे कंपनी ,मामा मामी , सासु सासरे व मोठ्या संख्येने वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती . लग्नासाठी मंडप , लायटिंग , साउंड सिस्टम , फटाक्यांची आतिषबाजी झाली तसेच सर्व वऱ्हाडी मंडळींना भात सांबर व लाफसी चे जेवण ठेवण्यात आले होते . या विवाहा मधे शेजारी पाजारी , नातेवाईक , गोरगरिब गावकरी व ऊसतोड मजुरांना जेवण देऊन अन्नदानाचे पुण्य जगताप परिवाराने कमावले . अँक्टिव्ह मराठी न्यूज. शिरूर .पुणे.







