विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न सासरच्या सातजणांविरोधात बारामती शहर पोलीस स्टेशमंध्ये गुन्हा दाखल.
पुणे जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे मराठी न्यूज बारामती पुणे

विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न सासरच्या सातजणांविरोधात बारामती शहर पोलीस स्टेशमंध्ये गुन्हा दाखल.
बारामती प्रतिनिधी ३० जानेवारी २०२५ माहेरहून पैसे आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.
पतीने गळा दाबून फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची बारामती घडली. या प्रकरणी ७ विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.१) निलेश मारुती लोणकर २) वंदना निलेश लोणकर
३) मारुती कृष्णा लोणकर ४) उमेश मारुती लोणकर ५) मंगेश मारुती लोणकर ६) शुभांगी उमेश लोणकर. सर्व राहणार कसबा.७) उमा नितीन घनवट राहणार डोर्लेवाडी,या. बारामती अशी गुन्हा दाखल झालेल्यांचे नावे आहेत. या प्रकरणी आरती निलेश लोणकर यांनी फिर्याद दिली फिर्यादीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दिनांक २४ रोजी ही घटना घडली. पती निलेश यांनी बाहेरून १० लाख रुपये घेऊन का येत नाही, तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये टी.व्ही., फ्रिज. वॉशिंग मशीन दिलेली नाही, ते तू घेऊन ये असे म्हणत शिवीगाळ मारहाण केली. त्यानंतर पती मारण्यासाठी चाकू शोधू लागला. चाकू न सापडल्याने त्याने बाथरूम मधील फरशी धुण्याचे लायझॉल आणले. पत्नी आरती यांना जमिनीवर पाडून तोंडामध्ये ओतले. त्यातील. दोन-तीन घोट तिच्या पोटामध्ये गेले. त्यानंतर आरती या पतीच्या तावडीतून सुटका करून घेऊ लागली असता तिला मारहाण करण्यात आली. तिने ११२ क्रमांकावर संपर्क साधत पोलिसांची तर १०८ क्रमांकावर संपर्क साधत रुग्णवाहिकेची मदत घेतली. रुग्णवाहिकेतून तिला उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सप्टेंबर २०२० मध्ये तिचा विवाह झाल्यानंतर सासरच्या अन्य मंडळींनी तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तिचे दागिने काढून घेण्यात आले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.







