बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात मनमानी भोंगळ कारभार* चतुर्थ श्रेणी कर्मचारी करतोय प्रयोगशाळेत तपासण्या:

बारामती प्रतिनिधी १३ जुलै.बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय नेहमीच तिथल्या कर्मचारांच्या कारभाराने चर्चेत राहिले आहे मात्र यावेळी तेथील चतुर्थ कर्मचारी चक्क प्रयोग शाळेत तपासण्या करीत असल्या बाबतची तक्रार महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना समाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते व भास्कर दामोदरे यांनी दिली आहे.
या रुग्णातील कंत्राटी तत्वावर चतुर्थश्रेणी कामावर असलेला एक कर्मचारी चक्क रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत रक्त तपासणी करीत असुन यामुळे एखादी अनिष्ट घटना घडू शकते सबब सदरच्या कर्मचा-यांवर आणि कार्यालय अधिक्षक यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करावील या आशयाची तक्रार महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना दिली आहे.
महाविद्यालयाचे हे सर्वाेपचार रुग्णालय आहे. मात्र अनेक आजारांवर आजच्या घडिला उपचार होत नाहीत तर अनेकदा रुग्णांना ससूनला जावे लागत आहे. त्यामुळे आजही अनेक क्लीस्ट आजारांवर तांत्रिक अडचणी कृत्रिमरित्या निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांची कुचंबना होत असल्याचे मत समाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते यांनी प्रतिनिधीस बोलताना व्यक्त केले.
*बारामती शहर विभागीय संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज बारामती*







