Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

यवत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा. एनडीए च्या परीक्षेत अभय ढगे यांची निवड देशात मिळवला 395 वा रँक

0 1 4 7 2 7

 

यवत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा एनडीए च्या परीक्षेत अभय ढगे यांची निवड
देशात मिळवला 395 वा रँक

पुणे (प्रतिनिधी)जिल्हा विभागीय संपादिका दिपाली दिवेकर.
यवत-केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीसाठीच्या (एनडीए) परीक्षेत राहू ता.दौड येथील गावकामगार तलाठी आनंद ढगे यांचे चिरंजीव अभय आनंद ढगे याने देशात 395 वा क्रमांक पटकाविला.
तिन्ही सैन्य दलातील उमेदवारांच्या निवडीसाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. लेखी परीक्षा व मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारावर 641 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांना पुणे (खडकवासला) येथे अभियांत्रिकीच्या पदवी शिक्षणासोबत लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अभय ढगे याने दुस-या प्रयत्नात हे यश मिळविले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण आर्मी पब्लिक स्कूल पुणे येथे तर गायत्री कॉलेज येथे माध्यमिक शिक्षण झाले.नोकरी निमित्ताने ढगे कुटुंब हे पुणे येथे स्थायिक असुन ते ते मूळचे नांदेड मधील कंधार तालुक्यातील आहेत.
अभयच्या देशसेवेचे स्वप्न पूर्ण’
अभय यांचे देशसेवा करण्याचे स्वप्न होते, ते पूर्ण होत असून आम्ही त्याला देशसेवेसाठी पाठवीत आहोत.दुस-या प्रयत्नांत त्याने हे यश मिळविले, याचा आम्हाला अभिमान आहे, असे अभयची आई शकुंतला व वडील आंनद ढगे यांनी सांगितले. अभयची बहीण आरती एमबीबीएस मध्ये नीट ची परीक्षा 623 गुणांनी उत्तीर्ण करत प्रवेश मिळवला असल्याने आमचा आनंद द्विगुणीत झाला असल्याचे मत आंनद ढगे यांनी व्यक्त केले अँक्टिव्ह मराठी न्यूज .यवत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे