बारामती.जामदार रोड अंबिकानगर येथील रहिवाशांची ड्रेनेजच्या दुरुस्तीची नगरपरिषदला मागणी.
विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे. अँक्टिव्ह मराठी न्यूज.बारामती.पुणे..

बारामती.जामदार रोड अंबिकानगर येथील रहिवाशांची ड्रेनेजच्या दुरुस्तीची नगरपरिषदला मागणी.

बारामती प्रतिनिधी:- २२ जानेवारी २०२५ बारामती नगर परिषद यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष करीत आहे. या दुर्लक्षपणामुळे या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. जामदार रोड कसबा अंबिकानगर या ठिकाणी अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरणाचे काम झाले आहे त्यामुळे रस्त्याच्या मधोमध असणारे ड्रेनेजची झाकणे खाली गेली असून त्या ठिकाणी खड्डे निर्माण झाले असल्याने अपघात सतत होत आहे. या परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. संबंधित नगर पालिकेचे अधिकारी यांना वारंवार तक्रार करून देखील बघण्याची भूमिका घेत आहेत. उडवा उडवी चे उत्तरे नागरिकांना देत आहेत.यावर कुठलीही उपाययोजना करू शकत नाहीत. मुख्याधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन याची दखल घ्यावी व या ड्रेनेजच्या झाकणांची उंची वाढवण्यात यावी. अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केले आहे. जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती. पुणे.







