तूच माझा विठ्ठल… तूच माझा पाठीराखा! : उपमुख्यमंत्री अजित दादा पवार…
बारामती प्रतिनिधी दि.७ जुलै. आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वारीत दंग होऊन वारकऱ्यांसोबत चालताना विठुरायाला राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले.. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा बारामतीत सहा जुलै रोजी दाखल झाला. शारदा प्रांगणात मुक्कामी पालखी विसाव्याला होती व आरती करण्याचे भाग्य खासदार सुनेत्रावहिनीसाहेब पवार त्यांना मिळाले लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या त्या आरतीने अवघी बारामती नगरी नामस्मरणात तल्लीन झाली. दुमदुमून गेली. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात बारामतीत दाखल या पार्श्वभूमी अजितदादा, आज पालखीचे दर्शन घेऊन ते बारामती ते काटेवाडी पर्यंत पायी चालत पालखीमध्ये सहभागी झाले.होते. बारामती शहर प्रतिनिधी दत्ताजी चांदणे सह तालुका विभागीय संपादक किरण बोराडे अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती.







