Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

सी. डी.देशमुख लॉ कॉलेजमध्ये सामाजिक दायित्व असणारे वकील घडावेत – न्यायाधिश भाग्यश्री पाटील मॅडम.

तालुका प्रतिनिधी राहुल जाधव अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर

0 1 4 7 2 7

सी. डी.देशमुख लॉ कॉलेजमध्ये सामाजिक दायित्व असणारे वकील घडावेत – न्यायाधिश भाग्यश्री पाटील मॅडम.

अहिल्यानगर तालुका (प्रतिनिधी) राहूल जाधव. सी. डी. देशमुख लॉ कॉलेजमध्ये
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधिश भाग्यश्री पाटील मॅडम यांच्या अध्यक्षते खाली रिल्स व शॉर्ट फिल्म मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
यावेळी न्यायाधिश.भाग्यश्री पाटील मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच विधितज्ञ ॲड. शिर्के सर , ॲड. शिरसाठ मॅडम, ॲड बी.बी. बोर्डे मॅडम , ॲड धिरडे सर यांनीही उपस्थीत राहून मार्गदर्शन केले
संस्थेचे सचिव प्रा . ना.म.साठे सर यांनी अध्यक्ष व मान्यवरांचे स्वागत केले. तसेच जिल्हा न्यायाधिश कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याने महाविद्यालयाच्या यशाचा आलेख उंचावेल असा आशावाद व्यक्त केला.तसेच प्रामाणिक सेवा देणाऱ्या वकिलांची फौज तयार करण्याचे स्वप्न सी. डी. देशमुख लॉ कॉलेजमध्ये साकार होत आहे ,यासाठी संस्थेच्या संचालिका ॲड कोमलताई साळुंखे समाजहित जोपासणारे विधीतज्ञ घडविण्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातुन विशेष प्रयत्न करत आहेत.
न्यायाधिश पाटील मॅडम यांनी मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले की, सामाजिक दायित्व व सेवेचा भाग म्हणजे वकिली होय हा संदेश रिल्स व शॉर्ट फिल्म माध्यमातून समाजापर्यंत पोहचवणे हाच स्पर्धेचा उद्देश आहे.80 सेकंदाची रिल्स व तीन मिनिटांचा व्हिडिओ यापैकी एका स्पर्धेत सहभाग नोंदवता येईल. या स्पर्धेसाठी उत्तम असे मार्गदर्शन केले. तसेच वकिल हे क्षेत्र खूप व्यापक असून ते सामाजिक बांधिलकीतून करावे असे मत व्यक्त केले.
ॲड. शिर्के सर यांनी विधी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजाचा प्रत्येक घटक आपल्यापर्यंत येत असतो त्यांना योग्य न्याय मिळवून देणे हे वकिलांचे कर्तव्य आहे. गरिबी निर्मूलन करण्यासाठी रिल्स व शॉर्ट फिल्म माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच समाजाचं भान ठेवून कल्पकता वापरून रील्स व शॉर्ट फिल्म बनवणे आवश्यक आहे.
शॉर्ट फिल्म व रील्सच्या माध्यमातून महाविद्यालयाचे नाव नालसा स्पर्धेत देशपातळीवर चमकवण्याची संधी आहे असे मतही ॲड बी. बी. बोर्डे यांनी व्यक्त केले.
ॲड. शिरसाठ मॅडम यांनी मनोन्याय या विषयावर रिल्स व शॉर्ट फिल्म बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. बौद्धिक व शारिरीकदृष्ट्या अक्षम व्यक्तीस योग्य वागणूक दीली पाहिजे. अशा व्यक्तींना महिन्याला 1500 रू. मिळतात. तसेच इतरही सुविधा मिळतात हे रिल्स व शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचवावे.
ॲड.डी. डी. बोर्डे मॅडम यांनी बालस्नेही (Childfriend) या विषयाचे मार्गदर्शन करत समाजाला मुलांच्या सुरक्षिततेची जाणिव करुन देणे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन केले. बालकांना एखादया साक्षी पुराव्याची माहिती विचारताना पोलिस व वकिल यांनी ड्रेसकोड चा वापर न करता सिव्हिल ड्रेसचा वापर करावा अशी माहिती समाजात माहिती असणे गरजेचे असल्याचे सांगीतले.
प्रा. ॲड सारंग गणबोटे यांनी महाविद्यालयाचा नावलौकिक देशभर करून कायद्याचे सखोल ज्ञान घ्यावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. प्रा. आण्णासाहेब थोरात सर, प्रा. सचिन तरटे सर, ऋषिकेश थोरात, प्रतीक्षा दळवी, अश्विनी शिं सेदे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थांना सहकार्य केले.यावेळी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वांचे आभार प्राध्यापिका सिध्दी मोभारकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी खुडे यांनी केले. अक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे