पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड यांना पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल सातेफळ रमाई युवा मंचाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर मुकनायक पुरस्कार प्राप्त
संपादक उमेश साठे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर

पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड यांना पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल सातेफळ रमाई युवा मंचाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर मुकनायक पुरस्कार प्राप्त

जामखेड (अँक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी /१८ एप्रिल २०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रहिवाशी खर्डा गावचे माजी सरपंच व पोलीस वारंटचे संस्थापक दिवंगत बापूसाहेब गायकवाड यांच्या कन्या साप्ताहिक पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड यांनी बापूसाहेब गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्रकारितेचा वसा आणि वारसा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेला आहे.
” अगदी वडिलांच्या पावलावर पाय ठेवून वडिलांप्रमानेच त्या निस्वार्थी पध्दतीने आज “गुन्हेगारी सह विविध विषयांचा वेध घेणारे साप्ताहिक पोलीस वारंट न्यूज. नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण आहिल्यानगर जिल्ह्यात पत्रकारिता करत आहेत .गोरगरीब, कष्टकरी,शेतकरी, गुन्हेगारी, राजकीय, सामजिक ,शैक्षणिक अशा अनेक पद्धतीच्या बातम्या त्या त्यांच्या अंकात प्रकाशित करतात . व सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यात प्रयत्न त्या त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून करत असतात. व त्यांची सर्वसमावेशक पत्रकारिता आज आहिल्यानगर जिल्ह्यात सुरू आहे म्हणून आज ह्याच गोष्टींची दखल घेऊन खर्डा हद्दीतील सातेफळ रमाई युवा मंचच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि१६एप्रिल रोजी श्वेता बापुसाहेब गायकवाड यांना पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल सातेफळ रमाई युवा मंचाच्या वतीने व सातेफळ ग्रामस्थांच्या वतीने त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मुकनायक पुरस्कार अंकुश सदाफुले (भूमीपुत्र) सेवानिवृत्त कारागृह अधीक्षक यांच्या हस्ते श्वेता गायकवाड यांना देण्यात आला आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अंकुश सदाफुले (भूमीपुत्र) सेवानिवृत्त कारागृह अधीक्षक, खर्डा पोलीस स्टेशनचे सपोनि विजय झंजाड,गोकुळ गायकवाड साहित्यिक जामखेड, युवराज (दादा) गोकुळ पाटील जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन आहिल्यानगर हे कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून आले होते.
यावेळी सातेफळचे सरपंच गणेश लटके, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ सदाफुले , विविध सामजिक क्षेत्रातील कार्यकर्ते पत्रकार,महिला बचत गट, शालेय विद्यार्थी , युवक,युवती , सातेफळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्वेता ताईंच्या प्प्रतिक्रिया जाणून घेऊया.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्काराने आज सातेफळ येथे मला सन्मानित करण्यात आले .रमाई युवा मंच व ग्रामस्थाचे मनापासून आभार . मिळालेले पुरस्कार आणि मान सन्मान नेहमीच उत्साहाने काम करण्यासाठी पुन्हा प्रेरणादायी ठरतात. असे म्हणाल्या.
संपादिका; श्वेता बापूसाहेब गायकवाड यांना ॲक्टिव्ह मराठी न्यूज व साठे परिवाराच्या वतीने आपणास पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अँक्टिव्ह मराठी न्यूज. जामखेड. अहिल्यानगर







