Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

शेवगाव त्रिमूर्ती पब्लिक स्कूल येथे ऍग्रीस्टॅक प्रशिक्षण संपन्न

0 1 4 7 2 7

शेवगाव त्रिमूर्ती पब्लिक स्कूल येथे ऍग्रीस्टॅक प्रशिक्षण संपन्न.

शेवगाव (प्रतिनिधी) नरहरी शहाणे : महाराष्ट्र शासनाच्या महत्वपूर्ण योजनेचा भाग असलेल्या ऍग्रीस्टॅक या प्रशिक्षणाची सुरुवात शुक्रवार दी 13 रोजी शेवगाव येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूल नेवासा रोड येथे महसूल अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला महाराष्ट्र शासनाच्या ऍग्रीस्टॅक या योजनेची माहिती महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना व कृषी विभागातील कर्मचारी यांना माहिती व्हावी या साठी एकदिवसीय प्रशिक्षण त्रिमूर्ती पब्लिक स्कूल नेवासा रोड शेवगाव येथे संपन्न झाले. सदर योजने अंतर्गत शेतकरी वर्गास शासना मार्फत देण्यात येणाऱ्या विविध सुविधा एका छताखाली देण्यासाठी या योजने अंतर्गत शेतकरी माहिती संघ तयार करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे शेत जमिनीचे ग्राम व महसूल अधिकारी यांच्यामार्फत आधार संलग्न करण्यात येणार असून ते संलग्न झाल्यानंतर कृषी सहाय्यक हे त्यास प्रामाणिककरन करून शेतकरी शेत आयडी तयार करून हा नवीन शेतकरी माहिती संच तयार करण्यात येणार आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने सर्व ग्राम व महसूल चे अधिकारी कृषी साहायक कृषी पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण वर्गास 42 ग्राम महसूल अधिकारी, 32 कृषी सहाय्यक व पर्यवेक्षक उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गास तहसीलदार प्रशांत सांगडे, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, मंडळ कृषी अधिकारी प्रशांत टेकाळे, नायब तहसीलदार दिपक करखिले उपस्थित होते. या प्रशिक्षणास तालुका ट्रेनर अमोल हिंगे यांनी मार्गदर्शन केले. तालुका प्रतिनिधी नरहरी शहाणे अँक्टिव्ह मराठी न्यूज. शेवगाव. अहिल्यानगर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे