Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बारामतीमध्ये एजंट/दलाल यांच्या पासुन सावध राहण्याचे लागले फलक*

0 1 4 7 2 7

बारामतीमध्ये एजंट/दलाल यांच्या पासुन सावध राहण्याचे लागले फलक*
बारामती प्रतिनिधी : १६ जुलै महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळ, मुंबई अंतर्गत बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संच वितरण योजना सुरु करण्यात आलेली आहे. सदरची योजना ही निशुल्क स्वरुपात जिवीत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सदरचा लाभ वितरीत करण्यात येते. तरी पुणे जिल्ह्यातील पात्र बांधकाम कामगारांना मंडळाच्या वतीने गृहपयोगी वस्तु संच मोफत/नि:शुल्क वितरीत करण्यात येते. परंतु दलाल, एजंट व काही ठरावीक लोकांनी एकत्र येऊन ओनलाईनच्या माध्यमातून नोंदणी व कामगारांचे कॉम्प घेण्याच्या नावाखाली कामगारांकडून १ हजार ते १५०० रुपये घेऊन लाखो रुपये उखळण्याचे पुरावे समोर येत आहेत. गृहपयोगी वस्तु संच देतो. म्हणुन कामगारांकडून पैसे घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक होत आहे. तरी बांधकाम कामगारांनी कोणत्याही एजंट/दलाल व इतर कोणत्याही व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करु नये. व्यवहारा संबंधी कामगारांची फसवणूक व दिशाभुल झाल्यास त्याबाबत हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. याबाबत पोलिस विभागाकडे रितसर तक्रार करावी याची पुणे जिल्ह्यातील सर्व कामगारांनी नोंद घ्यावी. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ एस. क्र १३१,मुक्ती टाऊनशिप, कारभारी नगर, कसबा-बारामती येथे कामगार सुविधा केंद्र, कार्यालयावर एजंट/दलाल यांच्या लुटमारी मुळे आशा प्रकारे बोर्ड लावण्याची वेळ आलेली आहे.
*बारामती शहर विभागीय*
*संपादक:केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज. बारामती*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे