Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्य अपात्र..

विभागीय उपसंपादक किसन पवार अँक्टिव्ह मराठी न्यूज.बीड.

0 1 4 7 2 7

बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्य अपात्र..

बीड (प्रतिनिधी) किशन बी पवार . जिल्हा विभागीय उपसंचालक. दिनांक.22. जानेवारी
बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील तेरा सरपंच तर 418 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत या आदेशाने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे ग्रामपंचायत निवडणूक मध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागावर निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकापासून बारा महिन्याच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे मात्र 2020 पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडणून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांची जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने त्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आष्टी अंबाजोगाई वडवणी पाटोदा माजलगाव केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचांचे सदस्य रद्द केले आहे. यापूर्वी ही केली होती कारवाई आधीही अशीच कारवाई झालेली होती त्यामुळे राज्य सरकारकडून कार्यकाळ वाढवून देण्यात आलेला होता ज्यामध्ये बऱ्याच सरपंच सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केली होती यामुळे पोटनिवडणुका त्या त्या गावात तळल्या होत्या कालावधी यावेळीही वाढून मिळतो का याकडे अपात्र सदस्य गाव गड्या तील राजकारणाची लक्ष असणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढताना शपथपत्र देऊन जात वैधता प्रमाणपत्र देऊ असे म्हटलेल्या ज्या सदस्यांनी अंज्या सरपंचांनी अद्याप प्रमाणपत्र दाखल केलेले नाही अशा सदस्याचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने सदस्यत्व रद्द केले आहे.बीड तालुक्यातील एकही सरपंचांच्या अपत्रे तिची कारवाई झालेली नाही यामध्ये धारूर तालुक्यातील घागरवाडा सरपंच गोपाल मारुती वेताळ पांगरी चे सरपंच सुनीता कालिदास डोंगरे कोळपिंपरीचे सरपंच अशोक अर्जुनराव यादव महेंदवाडीचे सरपंच आकाश बंडू गरणे गांजपूरचे सरपंच कस्तुराबाई साला पवार माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव चे सरपंच अनुसया मधुकर आढाव नागडगाव ची सरपंच सरस्वती भास्कर जाधव फुले पिंपळगावचे सरपंच चंद्रकांत सिताराम धोंगडे शिंदेवाडी चे सरपंच शशिकला प्रकाश वाघमारे पाचेगाव चे सरपंच विमल मधुकर थोरात चिंचोली नाथ रोहिणी मारुती सांगळे कोपराचे सरपंच शारदा लालाभारती तडोळचे सरपंच ज्ञानेश्वरी विष्णू कांबळे या 13 सरपंचाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. अँक्टिव्ह मराठी न्यूज.बीड.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे