अहिल्या नगरमध्ये प्रथमच सकल मातंग समाजाचा विद्यार्थी पालक मेळावा संपन्न होणार…
—विद्यार्थी पालक मेळावा —
सर्व मातंग समाज बंधु व भगिनी यांना नम्र निवेदन आहे की , सोमवार ,दि. १४/१०/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते ४.०० या वेळेत , महालक्ष्मी मंदीर परिसर , माळीवाडा , अहिल्यानगर येथे विद्यार्थी पालक मेळावा आयोजित केला आहे.
संदर्भात नियोजनपुर्व बैठक माळीवाडा , महालक्ष्मी मंदीराचे पटांगणात नुकतीच पार पडली. याप्रसंगी सर्वश्री – संजय भोंडवे ,कार्याध्यक्ष
डॅा. प्रा. बी. आर. पवार सर , जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर जिल्हा .
कैलास ऊमाप , समन्वयक , अहिल्यानगर जिल्हा
लहानुभाऊ खरात, तालुकाध्यक्ष अकोले
बाबासाहेब साठे,शहर अध्यक्ष,अहिल्यानगर
ऊमेशभाऊ साठे, शहर उपाध्यक्ष ,
अहिल्यानगर
मच्छिंद्र आरणे ,राहाता तालुकाध्यक्ष
काळुराम बोरुडे, समन्वयक राहाता
प्रकाश थोरात , ज्येष्ठ पत्रकार,
डेव्हीड औचिते , सामाजिक कार्यकर्ते
तुपसंदर साहेब, ज्येष्ठ समाजसेवक पोपटराव साठे,
,डी जी साठे,
इ. मान्यवर ऊपस्थित होते. सदर विद्यार्थी पालक मेळाव्यास , खादी ग्रामोद्योग मंडळ अहिल्यानगर ,गव्हर्मेंट पॅालिटेक्निक
अहिल्यानगर , औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( आय. टी आय.) , सहा.आयुक्त सामाजिक न्याय विभाग व बार्टी येथील अधिकारी, प्राध्यापक, व इन्स्ट्रक्टर तथा महाराष्ट्रातून अनेक मान्यवर ऊपस्थित राहणार आहेत. व विद्यार्थी आणि पालक यांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत तरी इयत्ता ९ वी च्या पुढील ग्रॅज्युएट पदविका पदवीधारक विद्यार्थी व त्यांचे पालकांनी या सुसंधीचा लाभ घ्यावा असे मा. ॲड .विक्रम गायकवाड, संस्थापक अध्यक्ष , मातंग समाज संघ ( महा. राज्य) यांनी जाहीर आवाहन केले आहे व आपला समाज शिक्षित , सशक्त व सुदृढ होण्यास हातभार लावावा. असे जाहीर आवाहन मी करीत आहे.
—*जिल्हा कार्यवाहक अहिल्यानगर*
इंजि. सुरेश जगधने*
. -*उपाध्यक्ष*, *महाराष्ट्र राज्य यांनी यावेळी माहिती दिली. संपादक उमेश साठे अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर (अहमदनगर)







