कोतवाली पोलीसांची धडाकेबाज कारवाई कत्तलीसाठी घेवुन जानारे १५ गोवंशीय जिवंत जनावरे व एक पीकअप सह एकुण ५,५५,००० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त.
कोतवाली पोलीसांची धडाकेबाज कारवाई कत्तलीसाठी घेवुन जानारे १५ गोवंशीय जिवंत जनावरे व एक पीकअप सह एकुण ५,५५,००० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त.
अ.नगर (प्रतिनिधी) दि.२२/०८/२०२३ रोजी मा. पोनि प्रताप दराडे साहेब यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, अहमदनगर शहरातील बेपारी मोहल्ला कसाई गल्ली झेंडीगेट अहमदनगर येथे अज्ञात इसम हे कत्तल करण्याकरीता व त्यांना चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना त्रास होईल अशा रितीने दोरीने दाटीरेटीमध्ये दोन पीकअप मध्ये बांधलेल्या स्थितीत गोवंशीय जातीचे जनावर घेवुन जात आहे अशी माहीती मिळाल्याने त्यांनी पोहेकॉ/१२१२ ए.पी. इनामदार पोकों/ दिपक रोहकले पोकों/ तानाजी पवार, पोकों/ सचिन लोळगे, पोकों/ सत्यजित शिंदे पोकों/ सुजय हिवाळे यांना सदरबाबत माहिती कळवुन खात्री करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या त्याप्रमाणे पोहेको १२१२ इनामदार यांनी पथकासह बेपारी मोहल्ला कसाई गल्ली झेंडीगेट अहमदनगर येथे जाणारे रस्त्यावर शोध घेतला असता एक पांढ-या रंगाचे पिकअप क्रमांक एमएच ०८ एपी ०८३६ हे संशयितरित्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने पोहेकॉ/ १२१२ इनामदारर व पथकाने सदर दोन पिकअप वाहनास थांबवुन त्यावरील चालकास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव- १) हकिम इब्राहिम शेख वय ४० वर्षे धंदा ड्रायव्हर रा. मुकुंदनगर अहमदनगर मोनं. ९७६७८६८०१८ २) अरबाज खलील शेख वय २३ वर्षे रा. कोठला झेंडीगेट अहमदनगर मोनं. ७३७८६९४३८७ 3) तोफिक युनूस कुरेशी असे असल्याचे सांगीतले त्यांस त्याचेगाडी मधील काय माल असल्याबाबत विचारपुस करता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याच्या गाडीची झडती घेतली असता पिकअप वाहनामध्ये १,०५,०००/-रु किंमतीचे ३ मोठ्या गोवंशीय जर्सी गाय काळे पांढरे च १२ लहान बछडे काळे पांढरे रंगाचे तसेच ४,५०,०००/-रु किंचे पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप असा एकुन ५,५५,०००/-रु किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन त्याचेविरुध्द कोतवाली पोस्टे गुरनं /२०२४ महाराष्ट्र प्राणी सरंक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५(ब), ९ प्रमाणे प्राणि क्लेश प्रतिबंध अधिनियम सह सन १९६० चे कलम ११ प्रमाणे पोकाँ सुरज कदम यांचे फिर्यादीवरुन् गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोहेकों/ बनकर हे करीत आहेत. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सोो, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती सो, यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सो,पोहेकॉ/१२१२ ए.पी. इनामदार पोना संगीता बडे पोकों/ दिपक रोहकले पोकों/ तानाजी पवार,/ सुरज कदम,पोकों/ सचिन लोळगे, पोकों/ सत्यजित शिंदे पोकों/ सुजय हिवाळे ,अनुप झाडबुके पोकॉ राम हंडाल यांच्या पथकाने केली. ब्युरो रिपोर्ट जॉन पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहमदनगर.







