Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे ज्योती अंबेकर यांच्या संवाद कौशल्य कार्यशाळेचे आयोजन”

0 1 4 7 2 7

स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे ज्योती अंबेकर यांच्या संवाद कौशल्य कार्यशाळेचे आयोजन”
अहिल्यानगर (प्रतिनिधी): दि. 4 डिसेंबर (ॲक्टिव्ह मराठी) .एक उत्तम वृत्त निवेदिका सूत्रसंचालक मुलाखतकार म्हणून महाराष्ट्राला सुप्रसिद्ध असलेल्या ज्योती अंबेकर यांच्या संवाद कला या कार्यशाळेचे आयोजन स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे एमआयडीसी येथे दिनांक 7 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता, रवींद्रनाथ टागोर सभागृह येथे करण्यात आले आहे. ज्योती अंबेकर या मुंबई दूरदर्शन केंद्रावर वृत्त संपादक तसेच वृत्त निवेदिका म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या वृत्त निवेदनामध्ये कुठेही कृत्रिमता किंवा नाटकीपणा नसायचा म्हणून त्यांचे , वृत्त निवेदन प्रभावशाली असायचे बातम्या वाचणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणे मुलाखती घेणे हा त्यांचा आवडता छंद, विशेषतः सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रांशी संबंधित जाहीर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तज्ञांच्या जाहीर मुलाखती, चर्चासत्रांचे समन्वय यातील आपलं कौशल्य तसेच अगदी सहजपणे पण स्वतः कमी बोलत मुलाखत कर्त्या कडून लोकांना आवश्यक असलेली उपयुक्त माहिती काढून घेण्याच्या आपल्या कौशल्याबद्दल त्या वाखाणल्या जातात , “सुखसंवाद” हा प्रेक्षकांशी त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर जाहीर संवाद साधण्याचा त्यांचा अनोखा उपक्रम आहे तो तीन प्रकारांमध्ये होतो एक केवळ महिलांसाठी “आहे तुझं दुसरा” दुसरा केवळ , युवक युवतींसाठी “हे दिवस फुलायचे” आणि तिसरा केवळ जेष्ठ नागरिकांसाठी “तुम्ही आम्हाला हवे आहात” या इंटरॅक्टिव्ह कार्यक्रमात त्या आरोग्य आहार कौटुंबिक सौहार्द मानसिक शांतता आणि व्यवस्थापन या विषयाच्या अनुषंगाने सहभागी प्रेक्षक वर्गाशी मनमोकळा संवाद साधतात त्यासाठी त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलवून त्यांच्याशी गप्पा ही मारतात. आपल्या मनातील प्रश्नांची उकल करण्यासाठी मदत व्हावी आणि जगण्याच्या व्यवहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक व्हावा हा या कार्यक्रमा मागचा हेतू आहे.
सूत्रसंचालन आणि संवाद कौशल्य कसे आत्मसात करायला हवे याविषयी या कार्यशाळे मध्ये ज्योती अंबेकर मार्गदर्शन करणार आहेत. नगरमधील इच्छुक सर्वांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन शाळेचे मानद संचालक राजेंद्र शुक्रे ,स्नेहालय अनिवासी प्रकल्पाचे संचालक हनीफ शेख आणि शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा मुंगी यांनी केले आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 9112384231 या नंबर वर संपर्क करावा.. अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे