Breaking
ब्रेकिंगसामाजिक

मोकाट जनावरांवर टाकले कोणीतरी अ‍ॅसिड बंगाल चौकीजवळील घटना

0 1 4 7 2 7

मोकाट जनावरांवर
टाकले कोणीतरी अ‍ॅसिड

बंगाल चौकीजवळील घटना

अहमदनगर (प्रतिनिधी)६जुलै – गाय, बैल व म्हैस अशा पाच ते सहा पाळीव जनावरांच्या पाठीवर व शेपट्यांवर कोणीतरी अ‍ॅसिड टाकल्याची घटना मध्य नगर शहरातील बंगाल चौकी परिसरात घडली. गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार झाल्याचा संशय आहे. महापालिकेला याची माहिती दिल्यावर या जनावरांना शुक्रवारी सकाळी इंजेक्शन्स देण्यात आली तसेच अ‍ॅसिडमुळे झालेल्या जखमांवर स्प्रे फवारण्यात आला. दरम्यान, या चौकात मोकाट जनावरे व मोकाट कुत्र्यांचा अड्डा झाला असून, त्याचा बंदोबस्त महापालिकेने करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
बंगाल चौकी परिसरातील रहिवाशी व व्यावसायिकांना शुक्रवारी सकाळी चौकातील मोकाट जनावरांच्या अंगावर जखमा दिसल्या. अ‍ॅसिडमुळे त्या झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी महापालिकेला कळवले. मनपाच्या कर्मचार्‍यांनी त्या जखमांवर स्प्रे फवारले तसेच जनावरांना इंजेक्शन्सही दिली. मात्र, पकडायला पथक आल्याच्या भीतीने बहुतांश जनावरे सैरावैरा पळत होती. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने मनपाच्या पथकाला निघून जावे लागले.
या परिसरातील उमेश गिल्डा, गणेश चव्हाण, उमेश शेलार, नकुल चंदे, संजय कलानी व अन्य रहिवाशांनी बंगाल चौकी चौकातील मोकाट पाळीव जनावरे व मोकाट कुत्र्यांच्या त्रासावर कायमस्वरुपी उपाययोजना मनपाने करण्याची गरज व्यक्त केली.भाकड गायी, बैल, वासरे, शेळ्या, म्हशी येथे दिवसभर असतात. प्राण्यांवर प्रेम व्यक्त करणारे भल्या सकाळीच येथे घास आणून टाकतात. अक्षरशः या दयाळू मंडळींची रांग येथे लागलेली असते. त्यामुळे रोज सकाळी तर 100वर जनावरे येथे असतात. नंतर ही जनावरे तेथेच रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने वाहतुकीस अडथळा होतो. या जनावरांमुळे रस्ते अपघात होऊन काहीजण जखमीही झाले आहेत, असे गिल्डा यांनी सांगितले. 40-50वर मोकाट कुत्रीही येथे असून, रात्रीच्या वेळी त्यांचा कळप वाहनांच्या मागे लागतो व यामुळेही अपघात झाले आहेत. काहींना मोकाट कुत्र्यांनी चावेही घेतले आहेत. त्यामुळे येथील पाळीव जनावरे व मोकाट कुत्री महापालिकेने तातडीने पकडावीत, अशी मागणीही गिल्डा यांनी केली. विभागीय उपसंपादक अमोल भांबरकर अँक्टिव्ह मराठी न्यूज .अहिल्यानगर. अहमदनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे