Breaking
राजकिय

भाजपचे अक्षय शिवाजीराव कर्डीले झाले राहुरी विधानसभा मतदार संघांचे आमदार आमदार अक्षय कर्डीले त्यांची राजकीय कारकीर्द ठरवणारी

0 1 4 7 2 7

active marathi :अहिल्यानगर :दि. 5 मे : स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडूणूक घेण्यात आली.या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डीले हे विजयी झाले, असून आता ते आमदार अक्षय कर्डीले म्हूणन या मतदार संघांचे लोकप्रतिनिधी झाले आहेत.
अक्षय कर्डिले एक लाख ११ हजार ८२६ मतांनी विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, २७ व्या फेरीअखेर अक्षय कर्डिले यांना एकूण १ लाख ३९ हजार २१२ मते मिळाली आहेत. भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांची ही राजकीय कारकीर्द ठरवणारी पहिलीच निवडणूक आहे.
२४ व्या फेरी अखेर मिळालेली मते
अक्षय कर्डिले (भाजपा ) – १,३९,२१२
गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी शरद पवार) – २७,३८६
संतोष चोळके (वंचित) – ५,६६३
रावसाहेब खेवरे (अपक्ष) – ७,२३४
(अक्षय कर्डिले – एक लाख ११ हजार ८२६ मतांनी विजयी)
पहिल्या फेरीत अक्षय कर्डिले यांना ४,९८८ मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या गोविंद मोकाटे यांना केवळ ७२२ मते मिळाली. पहिल्या फेरीअखेर कर्डिले यांना ४,२६६ मतांची आघाडी मिळाली. कर्डिले यांना पहिल्या फेरीपासून मिळालेली आघाडी सोळाव्या फेरीअखेर कायम राहिली. अखेर २७ व्या फेरीअखेर अक्षय कर्डिले एकूण १ लाख ३९ हजार २१२ मते मिळवत विजयी झाले.
दरम्यान निकालाच्या काही वेळापूर्वी कर्डिले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “जनतेने दाखवलेला विश्वास आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करू. ही निवडणूक सर्वसामान्यांनी हातात घेतली होती. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे