Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगसामाजिक

बालभवनच्या कार्यक्रमातून विविधतेतून एकतेचा संदेश: सांस्कृतिक सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली

विभागीय उपसंपदिका संगीता खिलारी अँक्टिव्ह म‌‌‌राठी न्यूज अहिल्यानगर.

0 1 4 7 2 7

*बालभवनच्या कार्यक्रमातून विविधतेतून एकतेचा संदेश: सांस्कृतिक सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली*

*अहिल्यानगर, दि. १९ जानेवारी २०२५*
बालभवन आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी शाळेत पार पडला. या कार्यक्रमाला मुलांच्या आणि पालकांच्या भरघोस प्रतिसादाने रंगत आली.

कार्यक्रमाला युनिव्हर्सल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. दिनेश मोरे, सेक्रेटरी श्री. गणेश पाटील, अल्केमिज अकॅडमीचे श्री. तुषार अंबाडे, राजमुद्रा अकॅडमीच्या संस्थापिका नंदाताई पांडुळे, बालभवनच्या मानंद संचालिका सौ. वैशाली चोपडा, दादा चौधरी नाईट स्कूलचे मुख्याध्यापक श्री. सुनील सुसरे, स्नेहालय संचालक श्री. हनिफ शेख व उड्डाण प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री. प्रवीण कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली. सोलो डान्स, ग्रुप डान्स, देशभक्तीपर गीत, नाटक, भारूड अशा सांस्कृतिक सादरीकरणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शास्त्रीय व लोकसंगीतावर आधारित नृत्यांमुळे रसिकांना पारंपरिक कलेचा आनंद मिळाला, तर सामाजिक संदेश देणाऱ्या नाटकांनी उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. “व्यसनाधीनता” आणि “मनोरुग्ण आहे अंधश्रद्धा नाही” या नाटकांनी विशेष लक्ष वेधले.

*खेळाडूंचा सन्मान:*
हिवाळी स्पर्धांमध्ये ५० व १०० मीटर धावणे, बटनरिले, खो-खो, कबड्डी यासारख्या खेळांमध्ये मुलांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

खो-खो (मुलं): प्रथम – ऊर्जा बालभवन, द्वितीय – उत्कर्ष बालभवन

खो-खो (मुली): प्रथम – ऊर्जा बालभवन, द्वितीय – उत्कर्ष बालभवन

कबड्डी (मुलं): प्रथम – डॉ. हळबे बालभवन, द्वितीय – उत्कर्ष बालभवन

कबड्डी (मुली): प्रथम – परिस बालभवन, द्वितीय – उत्कर्ष बालभवन

सांस्कृतिक स्पर्धांमध्ये चमक:

*सोलो डान्स:*
प्रथम – मलाला बालभवन, द्वितीय – ऊर्जा बालभवन, तृतीय – डॉ. हळबे बालभवन

*नाटक:*
प्रथम – “व्यसनाधीनता”, द्वितीय – “मनोरुग्ण आहे अंधश्रद्धा नाही”

*प्रि-स्कूल स्पर्धा:*
प्रथम – “ये दुनिया एक दुल्हन” उत्कर्ष बालभवन, द्वितीय – “बम बम बोले” डॉ. कलाम बालभवन, तृतीय – “नाच रे मोरा” परिस बालभवन

सर्व विजेत्यांना सन्मानचिन्हे व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.

*कार्यक्रमाचा विशेष संदेश:*
सांस्कृतिक कार्यक्रमाने केवळ कलागुणांना वाव दिला नाही तर सामाजिक एकतेचा संदेश दिला. स्थानिक कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देऊन नव्या पिढीमध्ये सांस्कृतिक जाण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अर्चना दिनकर आणि ओम शिंदे यांनी केले. प्रस्तावना सौ. वैशाली चोपडा यांनी सादर केली, तर पाहुण्यांचा सत्कार साजेदा शेख यांनी केला. आभार प्रदर्शन श्री. हनिफ शेख यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. उषा खोल्लम, प्रतीक्षा साळवे, संतोष बेदरकर, यास्मिन शेख, रुबिना शेख, सुनिता औटी, जयश्री शिंदे, रजिया दफेदार, विना वड्डेपेल्ली, शारदा न्यानपेल्ली, सचिन वाघ, गुलनाज शेख आणि सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

*बालभवनच्या या उपक्रमाने विविधतेत एकतेचा साक्षात्कार घडवून आणला आणि समाजात सकारात्मक संदेश पसरवला.* अक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे