Breaking
ब्रेकिंगसामाजिक

राहुरी तालुक्यातील शहर लगतचे बस स्थानकाचे कामाची आ.तनपुरे यांच्याकडून पाहिणी..

0 1 4 7 2 7

राहुरी तालुक्यातील शहर लगतचे बस स्थानकाचे कामाची आ.तनपुरे यांच्याकडून पाहिणी..

राहुरी (प्रतिनिधी) दि. १५ राहुरी शहरातील गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या राहुरी बस स्थांनकाच्या नवीन इमारतीचे काम सुरू झाले असून या कामाची पाहणी काल रविवारी माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. अद्यावत व प्रवाशांच्या सोयीसाठी राहुरी बस स्थानक नावीन्यपूर्ण असावे यासाठी परिवाहन महामंडळ व राज्य सरकार यांच्यामध्ये योग्य समन्वय राखत विविध बैठका घेऊन प्रश्न निकाली काढण्यासाठी मोठे परिश्रम घेतले होते.सुमारे सतरा कोटी रुपये खर्च प्रशासकीय मान्यता मिळालेली असून त्यातील पावणेचार कोटी रुपयाचे काम हाती घेण्यात आली आहे. ठेकेदार कंपनीने बस स्थानकाची इमारत जमीनदोस्त केली सध्या तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याचे शेड उभारण्यात आले असून प्रवाशांची संख्या पहाता ते अपुरे पडत आहे त्यासाठी शेडची व्याप्ती वाढवावी व विद्यार्थ्यांच्या पासासाठी शेडमध्ये त स्वतंत्र केबिन करावी अशा सूचना आमदार तनपुरे यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. राहुरी शहराच्या वैभवात भर पडेल व प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी अधिक जागृत राहुन काम पूर्ण करण्यावर लक्ष असेल असे आमदार यांनी नमूद केले. यावेळी बस स्थानक प्रमुख विजय वाघ, कनगरचे माजी उपसरपंच सुयोग नालकर, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष अनिल घाडगे व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी .उत्तर विभागीय उपसंपादक प्रशांत जोशी अँक्टिव्ह मराठी न्यूज राहुरी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे