अ ब ब… नगरमध्ये दिसला १२ फुटी अजगर
अ.नगर दि. २५ ऑगस्ट (प्रतिनिधी) : महेश कांबळे
नगर मधील किल्ल्याच्या जवळ असलेल्या आय लव नगर गार्डन येथे रात्री तीनच्या दरम्यान बारा फुटी अजगर दिसला,रात्री कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आल्याने घराच्या गेटच्या बाहेर पाहिले असता येथील रहिवाशांना १२ फुटी अजगर दिसला,त्याला पाहताच धस्स झाले, सर्पमित्र हर्षद कटारिया यांना बोलवण्यात आले त्यांनी त्याला पकडले,त्यासाठी करण पारखे,किशोर पारखे,कौशल जोशी,गोविंद जोशी आदींनी त्यांना सहकार्य केले
नंतर सकाळी या अजगराला सुरक्षित रित्या जंगलात सोडण्यात आले,याबाबत बोलताना बन्सीमहाराज मिठाईवालाचे गोविंद जोशी म्हणाले की हा भाग निसर्ग समृद्ध आहे,तसेच तीन वर्षांपूर्वी एवढाच मोठा अजगर एसी रेकॉर्डच्या चौकात दिसला होता, नगर शहारा बाहेरील भाग निसर्ग समृद्ध असून आपण त्या निसर्गाची जपून केलीपाहिजे,तसंच किल्ल्यात अनेक प्राणी, पक्षी येथे दिसतात. यामध्ये मोर सुद्धा आहेत, या ठिकाणी पर्यटन क्षेत्र जर झाले तर अजून चांगले व्यवस्थापन करून प्राणी,पक्षाची जपवणूक होईल.
नगरमधील किल्ल्याच्या जवळ बारा फुटी अजगर दिसला,सर्पमित्र हर्षद कटारिया यांना त्याला पकडले त्यांना करण पारखे,किशोर पारखे,कौशल जोशी,गोविंद जोशी आदींनी त्यांना सहकार्य केले







