गिरगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..
प्रतिनिधी रवीं कुंटे ॲक्टिव्ह मराठी न्यूज.वसमत हिंगोली.

गिरगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..
प्रतिनिधी – रवि कुंटे, हिंगोली
वसमत दिनांक 8 तालुक्यातील गिरगाव येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी गिरगाव येथे बौद्ध समाज बांधवांनी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 127 वी जयंती आंबेडकर नगर येथे साजरी करण्यात आली.
सर्वांनी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प पुजन करून ञिवार अभिवादन केले. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जडणघडणीत पत्नी त्यागमुर्ती माता रमाई यांचा खुप मोठा वाटा आहे.
त्यांच्या प्रती समाजामध्ये खूप आदर व आपुलकी आहे समाधानाची, सहकार्याची, आणि सहिष्णुतेच्या मूर्ती असलेल्या माता रमाई यांनी समाजासाठी केलेला त्याग हा मोठा असुन तो सर्व सामान्य जनतेपर्यंत व नविन पिढीला मार्गदर्शन ठरण्याकरीता प्रबोधन लोक शिक्षणाच्या हेतूने केली जाते. या दिनाचे औचित्य साधून गिरगाव येथील बौद्ध समाज व रमा माता महिला मंडळ यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांची 127 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी गिरगाव ग्रामपंचायत सरपंच सौ पुनमताई नादरे, कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे,बिट जमादार वडकीले, बाभळे, पोलीस पाटील गंगाधर शिवणकर, पत्रकार प्रमोद नादरे, शाम नादरे, आर के पाटील, व आजुबाजूच्या परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती.
या साठी भिम प्रेमींनी आठवड्यापासून नियोजन बद्ध कार्यक्रमाचे आयोजन केले दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी घरापुढे आकर्षित रांगोळी आकर्षित सजवलेल्या रमाईच्या प्रतिमेस सजावट केली. माता रमाई यांच्या जीवनावर कार्यावर आधारित मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी रमा माता महिला मंडळ, लहान बालक-बालिके, तरुण तरुणी युवा यांची मोठ्या प्रमाणात शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थिती लाभली होती. तसेच यावेळी सायंकाळच्या सत्रामध्ये जयंती मंडळातर्फे भव्य असा भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अँक्टिव्ह मराठी न्यूज.







