Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

आरडगावच्या उपसरपंच पदी निलेश जगधने यांची बिनविरोध निवड

ॲक्टिव्ह मराठी न्यूज.उत्तर विभागीय संपादक दत्ताजी जोगदंड. राहूरी.

0 1 4 7 2 7

आरडगावच्या उपसरपंच पदी निलेश जगधने यांची बिनविरोध निवड
राहुरी तालुक्यातील पूर्व भागामध्ये अति प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आरडगाव ग्रामपंचायतची आज दि. ०३/१२/२०२४ रोजी उपसरपंच पदाची बिनविरोध निवड झाली. या निवडीमध्ये आरडगाव येथील उच्चशिक्षित निलेश मच्छिंद्र जगधने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अल्पवधीत फुले-शाहू-आंबेडकर चळवळीत कार्यरत होऊन श्री निलेश मच्छिंद्र जगधने यांनी आपला समाजकार्यात एक आगळावेगळा ठसा निर्माण केला. त्यांनी केलेल्या कामाची चुणूक राहुरी- नगर-पाथर्डी मतदारसंघातील मान्यवरांच्या नजरेत भरली. सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या संघटनेचे ते राज्य प्रवक्ते असून त्यांनी आपलं समाज प्रबोधनाचं काम नेटाने चालू ठेवले. आडगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन त्यांनी आपल्या गावात ग्राम विकास मंडळ मार्फत व आदरणीय सरपंच सुरेखा रविंद्र म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात वेगवेगळ्या कामांना सुरुवात केली. त्यामध्ये दलित,वस्ती अंतर्गत रस्ते,स्मशानभूमी, सुशोभीकरण,गावातील स्टेट लाईट, महालक्ष्मी मंदिराचे काम, साठवण तलावाचे काम, अंतर्गत गटार व नाला दुरुस्तीचे काम, दलित आदिवासी बहुजन वस्त्यांना महापुरुषांचे नावे अशा समाज उपयोगी कामाचा त्यांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावाला लाभ मिळवून दिला. म्हणूनच अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते करत असलेल्या सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या संघटनेच्या मार्फत महायुतीचे उमेदवार आदरणीय शिवाजीराव कर्डिले यांचा प्रचार व प्रसार करून त्यांना राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघात आदरणीय शिवाजीराव कर्डिले यांना निवडून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. अशा उच्चशिक्षित, चळवळीतील काम करणारा लढवया कार्यकर्ता व सर्वसामान्यांच्या प्रश्नाला नेहमी उभा असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती झाली आहे. अशा या कार्यकर्त्यांची निवड आरडगावच्या उपसरपंच पदी झाल्यामुळे परिसरात आनंद व्यक्त करण्यात आला आहे. या निवडीबाबत आडगावचे ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या तसेच सत्यशोधक लहुजी क्रांती सेना, वंचित बहुजन आघाडी,बहुजन युथ पँथर, फ्रीडम पावर पत्रकार संघ व अनेक सामाजिक संघटनेनी त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राहुरी उपविभागीय संपादक: दत्ता जोगदंड ॲक्टिव्ह मराठी न्यूज. आरडगाव. राहुरी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे