पुरोगामी चळवळीचे जेष्ठ नेते डॉ.बाबा आढाव यांच्या आंदोलनाला राहुरी च्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांचा पाठींबा.

पुरोगामी चळवळीचे जेष्ठ नेते डॉ.बाबा आढाव यांच्या आंदोलनाला राहुरी च्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांचा पाठींबा.

राहुरी (प्रतिनिधी) दिनांक 3 डिसेंबर EVM मशीन ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यात याव्यात.
मा. राज्यपाल यांना मा. तहसीलदार सो, राहुरी यांचे द्वारे निवेदन सादर करण्यात आले
नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. निवडणुक निकालामध्ये सत्तेच्या माध्यामतून EVM मशीन चा गैरवापर करून महायुतीने बहुमत मिळवले आहे. या बाबतच्या अनेक घटना आपल्या समोर पुराव्यानिशी मांडल्या जात आहेत. अनेक उमेदवारांनी आक्षेप घेतले आहेत. प्रसारमाध्यमांनी देखील आपापले निष्कर्ष मांडले आहेत. यात सर्वात महत्वाची आणि अधोरेखित करावी अशी बाब म्हणजे तब्बल ९५ मतदार संघात झालेले मत आणि मोजलेले मत या मध्ये मोठा फरक आढळून आला आहे. तसेच १३,५३, १५१ इतकी मत अतिरिक्त आढळून आले आहेत. या मुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.
लोकशाही च मूल्य पायदळी तुडवले गेले आहे. निवडणुकीत पारदर्शकता राहिलेली नाही. लोकांचा विश्वास निवडणुकीवरून उडत आहे. प्रचंड पैशाचा वापर निवडणुकीत वाढला आहे. हि चिंताजनक बाब आहे
म्हणून पुरोगामी चळवळीचे जेष्ठ नेते डॉ बाबा आढाव यांनी दिनांक २८ ते ३० पर्यंत आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनाला महाविकास आघाडी सरकारच्या सर्व नेत्यांनी पाठींबा दिला. तेसेच सर्व सामाजिक चळवळीच्या नेत्यांनी देखील सहभाग घेऊन पाठींबा देऊन आंदोलन तीव्र करण्याची भूमिका घेतली आहे. आम्ही राहुरी येथून सदरील आंदोलनाला पाठींबा जाहीर करून सहभागी होत आहोत. आणि आम्ही अशी मागणी करत आहोत कि, या पुढील निवडणुका EVM मशीन ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्याव्यात. अशी मागणी करण्यात आली.
या प्रसंगी आयु.शिरीष गायकवाड, राधेश्याम कुसमुडे, कुमार भिंगारे, राजू ठाकर, अमजद पठाण, संदीप कोकाटे, सतीश गायकवाड, आदित्य साळवे, महेश साळवे, विकी बोर्डे, यमुनाताई भालेराव, सिध्दार्थ नेहे, इम्रान सय्यद, तोसिफ शेख, शुभम पवार, प्रवीण धांडे, सुदर्शन बोर्डे, डॉ जालिंदर घिगे. इत्यादी उपस्थित होते.
उत्तर विभागीय संपादक:दत्ता जोगदंड अँक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी.







