Breaking
ब्रेकिंगसामाजिक

रतन टाटांना प्रभाकरम तर्फे वृक्षरोपणाद्वारे आदरांजली*

0 1 4 7 2 7

रतन टाटांना प्रभाकरम तर्फे वृक्षरोपणाद्वारे आदरांजली*

केडगाव येथील प्रभाकरम फाऊंडेशन मार्फत केडगाव उपनगर तसेच चास, नेप्ती परिसरात वृक्षारोपण करून स्व रतन टाटाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, आजकाल ओंजळ भरल्यानंतर समाजाला देणारे बरेच जण आहेत, पण ओंजळ भरायची आणि तीच समाजाला दान करायची असे मूल्य सरांनी आयुष्यभर जोपासले. रतन सरांनी 22 व्या शतकातील भारताचा पाया रोवला आहे. भविष्यात भारत जेव्हा विश्वगुरू बनेल तेव्हा त्यात सर्वात जास्त श्रेय सरांच असेल असे प्रतिपादन प्रभाकरम फाऊंडेशन चे अध्यक्ष विपुल तापकीर यांनी केले.
यावेळेस फाऊंडेशन मार्फत वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब अशा 53 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळेस फाऊंडेशन चे मार्गदर्शक हेड कॉन्स्टेबल रविभाऊ टकले, उपाध्यक्ष अभिषेक थोरात, सौरभ शर्मा, शिवम थोरात, दिनेश पांढरे, निखिल बहिरट, सौरव बल्लाळ व परिसरातील नागरिक उपस्थित होते. परिसरातील नागरिक व लोकप्रतिनिधींनी या उपक्रमाचे कौतुक केले. नरहरी शहाणे अँक्टिव्ह मराठी न्यूज. पाथर्डी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे