समाज कल्याण विभागातील वस्तीगृह मधील समस्यांचा अभिजीत ससाने यांनी खासदार लंके यांच्याकडे वाचला तक्रारींचा पाढा.
तालुका प्रतिनिधी राहुल जाधव ॲक्टिव मराठी न्यूज. देहरे

समाज कल्याण विभागातील वस्तीगृह मधील समस्यांचा अभिजीत ससाने यांनी खासदार लंके यांच्याकडे वाचला तक्रारींचा पाढा.

अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहामधील अनेक तक्रारीबाबत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या अन्याय बाबत राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाने यांनी खासदार लंके यांच्याकडे माहिती दिली त्यावर खासदार लंके यांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून वस्तीगृह तक्रारींचे दूर करण्याचे आदेश दिले
गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मुलांच्या व मुलींच्या सर्व शासकीय वस्तीगृहाबाबत विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाने यांच्याकडे आल्या होत्या विद्यार्थ्यांना जीवन निकृष्ट दर्जाचे दिले जाणे सरकारने ठरवून दिलेला नाष्टा न देणे निकृष्ट नाष्टा देणे अधिकाऱ्यांनी वस्तीगृहावर न थांबणे वस्तीगृहातील प्रचंडअस्वच्छता असणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पूर्णपणे दुर्लक्ष करणे या आणि अशा अनेक विद्यार्थ्यांचे अडचणी होत्या गोरगरीब विद्यार्थ्यावर होत असलेल्या अन्याबाबत ससाणे यांच्याकडे अनेक तक्रारी होत्या अभिजीत ससाने यांनी या सर्व तक्रारींच्या संदर्भात खासदार निलेश लंके यांची भेट घेऊन माहिती दिली व खासदार लंके यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली खासदार लंके यांनीही तात्काळ या प्रश्नात लक्ष घालून संबंधित वस्तीगृहांच्या अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याचे आदेश दिले व सामाजिक न्याय विभागात अंतर्गत येणाऱ्या या वस्तीगृहांच्या दर्जा सुधारण्याबाबत आश्वासित केले.

अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर







