Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारलेला समतेचा मार्ग जगभर स्वीकारला जाईल – ॲड.डॉ.विद्याधरजी काकडे.

शेवगाव ,पाथर्डी तालुका प्रतिनिधी नरहरी शहाणे अँक्टिव्ह मराठी न्यूज.

0 1 4 7 2 7

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारलेला समतेचा मार्ग जगभर स्वीकारला जाईल – ॲड.डॉ.विद्याधरजी काकडे*

शेवगाव. (अक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी नरहरी शहाणे ज्या -ज्या वेळेस देशात समता नांदली, त्यावेळेस देशाची प्रगती झाली. महापुरुषांना जातीपातीच्या बंधनात अडकवण्याचे काम त्या -त्या समाजातील लोकांनी केले. हा त्यांच्यावरील सर्वात मोठा अन्याय असून तो या देशाला, विश्वाला व मानवतेला मारक आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती धर्माच्या भिंती ओलांडून मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले. महापुरुष हे सर्व जाती धर्माचे असतात.देशामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर अर्थतज्ञ होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारताची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे. देशामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी स्वीकारलेला समतेचा मार्ग हा जगभर स्वीकारला जाईल असे प्रतिपादन कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड.डॉ. विद्याधरजी काकडे यांनी केले. ते आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी अभिवादन करताना बोलत होते.
ॲड.डॉ. काकडे पुढे बोलताना म्हणाले की सवितामाई आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे सर्वांनी वाचन करावे.या ग्रंथांचे वाचन केल्यावरच आंबेडकरांच्या जीवनाचा त्याग आपल्याला समजेल. ग्रंथांचे वाचन, चिंतन, मनन केल्यामुळेच आपल्याला डॉ.बाबासाहेबांचे खरे जीवन समजेल .
आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आज अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा.अशोक तमनर व ज्ञानेश्वर गरड यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.डॉ. लक्ष्मणराव बिटाळ ,शिक्षण विभाग प्रमुख वंदना पुजारी, सहप्रमुख अशोक आहेर ,प्राचार्य संपतराव दसपुते ,उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर, उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड, पर्यवेक्षक सुनील आव्हाड, हरिश्चंद्र मडके व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा उकीर्डे यांनी तर आभार प्रकाश गांगर्डे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. ॲक्टिव्ह मराठी न्यूज. शेवगाव.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे