अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवा नसता राज्यकर्त्यांना दलित वस्तीत येऊ देणार नाहीत :-अशोक ढगे.

लोकशाहीर, साहित्यसम्राट. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवा नसता राज्यकर्त्यांना दलित वस्तीत येऊ देणार नाहीत :-अशोक ढगे.

माजलगाव (ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी किसन बी पवार/माजलगाव. दिनांक 7 मार्च 2025 रोजी माजलगाव तहसीलदार यांना आझाद क्रांती सेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले अण्णाभाऊ साठे यांचे महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये मोलाचे योगदान असून इथल्या शोषित उपेक्षित वंचितांचे दुखणं आपल्या धारदार लेखणीच्या माध्यमातून जगांच्या समोर आणण्याचं काम ज्या महानायकाने केलं त्या महानायकाचा पुतळा माजलगाव शहरातील विश्रामगृह येथे भव्य उभारण्यात यावा असे निवेदन आझाद क्रांती क्रांती सेनेचे तालुकाप्रमुख अशोक ढगे व आझाद क्रांतीसेना माजलगाव तालुका कार्यकारणी च्या वतीने माजलगाव तहसीलदार यांना देण्यात आले सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या वरती प्रेम करणाऱ्या समाजाने या पुतळ्याची मागणी केलेली आहे त्यामुळे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात यावा नसता प्रस्थापित राजकर्त्यांना आम्ही दलित वस्तीमध्ये येऊ देणार नाहीत असे आझाद क्रांती सेनेचे तालुकाप्रमुख अशोक ढगे यांनी म्हटले आहे. याप्रसंगी
तालुका प्रमुख अशोक ढगे, ज्येष्ठ नेते किसन भिसे सर, कैलास गायकवाड, गौपाळ गवळी,शिवाजी कवडे,संदिप भिसे,मल्हारी ढगे,धमानंद भालेकर,असलम पठाण,राहूल क्षिरसागर,बाळू उपाडे,वैभव चांदणे,राहूल गायकवाड,बाबूराव गायकवाड,सूरेश घोडे,उमेश भिसे,सूरवसे कृष्णा कैलास, कैलास शिंदे , कूरेशी कालू, अनिल हिवाळे,करण गायकवाड,गौतम वारे,गणेश कोल्हे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ॲक्टिव्ह मराठी न्यूज माजलगाव. बीड.







