राहुरी येथील कृषी विद्यापीठयेथे वाहनातून गॅस गळती…
उत्तर विभागीय उपसंपादक प्रशांत जोशी ॲक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी अहिल्यानगर

राहुरी येथील कृषी विद्यापीठयेथे वाहनातून गॅस गळती…

अँक्टीव्ह मराठी न्युज उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी राहुरी… नगर-मनमाड रस्त्यावर महात्मा फुले कृषी विद्यापीठ जवळ असणाऱ्या धर्माडी गेस्ट हाऊस जवळ, पाणी व्यवस्थापन प्रकल्पासमोर एका वाहनाच्या टाकी मधून गॅस गळती सुरू झाली.मात्र पोलिस व विद्यापीठातील कर्मचार्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली . याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नगर मनमाड राज्य महामार्गावरील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जवळपास असणाऱ्या धर्माडी गेस्ट हाऊस व पाणी व्यवस्थापन प्रकल्पासमोर एका वाहनाच्या टाकीतून गॅस गळतीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी तात्काळ सुरक्षा रक्षकांची टीम घेऊन पुढील दुर्घटना टाळण्यासाठी प्रसंगावधान राखून रस्त्यावरील वाहनाची रांग लागलेली असताना, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहनातील गॅस टाक्या पुर्ण रिकाम्या केल्या.त्यानंतर काही वेळानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली.त्या मुळे राजस्थानांमध्ये झालेल्या स्फोटासारखी गंभीर दुर्घटना टाळली आहे.सदर प्रसंगी डी.एन.जाधव, दत्तात्रय रवि काळे, अक्षय येणारे यांच्यासह इतर सुरक्षा रक्षकांनी तत्परता दाखविल्या मुळे पुढील अनर्थ टळला.राहुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांचे सर्व कर्मचारी तसेच सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे व त्यांच्या सुरक्षा रक्षकांचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील व विद्यापीठाचे कर्मचारी, अधिकार्यकडून कौतुक होत आहे. ॲक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी. अहिल्यानगर







