Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगसामाजिक

स्वतःला आधाराची गरज असणाऱ्या दिव्यांग बांधवांनी दिला विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंच्या मदतीचा आधार*

0 1 4 7 2 7


राहुरी (प्रतिनिधी) ११ जुलै . राहुरीनगरपालिका शिक्षण मंडळाची नूतन मराठी शाळा क्रमांक जोगेश्वरी आखाडा या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री श्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रहार दिव्यांग संघटना अहमदनगर यांचे वतीने अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष श्री मधुकरराव घाडगे जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख तालुकाध्यक्ष योगेश लबडे तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी कार्याध्यक्ष संजय देवरे व राहुरी तालुक्यातील संघटनेतील सदस्यांच्या वतीने नूतन मराठी शाळा नंबर 2 जोगेश्वरी आखाडा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य त्यामध्ये कंपास, वह्या ,पेन ,पेन्सिल ,वॉटर बॉटल या वस्तूंचे वाटप करण्यात आले आजच्या समाजामध्ये खऱ्या अर्थाने दिव्यांग बांधवांनी स्वतःला आधाराची गरज असताना त्यांनी इतरांना आधार देण्याचे काम केले हे एक कौतुकास्पद व इतरांना प्रेरणादायी असे काम आहे अशी भावना माजी नगरसेवक प्रकाश भुजाडी व जोगेश्वरी आखाड्यावरील पालकांनी व्यक्त केली विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या शाळा उपयोगी वस्तूंचा विद्यार्थी निश्चित पणाने चांगला उपयोग करतील असे या ठिकाणी पालकांच्या वतीने नमूद करण्यात आले
कार्यक्रम यशस्वी करण्याकामी शाळेचे मुख्याध्यापक श्री मच्छिंद्र लोखंडे शिक्षक बाळासाहेब गोरे, शिक्षिका श्रीमती शेलार मॅडम ,श्रीमती राऊत मॅडम ,श्रीमती भगत मॅडम, श्रीमती पाटील मॅडम ,श्रीमती सांगळे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रतिनिधी दत्ता जोगदंड अँक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे