Breaking
ब्रेकिंगराजकिय

राहुरीची प्रशासकीय इमारत तहसील कार्यालयाच्या ठिकाणीच व्हावी : तनपुरे..

0 1 4 7 2 7

राहुरीची प्रशासकीय इमारत तहसील कार्यालयाच्या ठिकाणीच व्हावी : तनपुरे.. *
राहुरी (प्रतिनिधी) १३ जुलै .राहुरी येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामाचा घाट शासनाने शहरापासून 4 कि.मी.वर बांधण्याचा घाट घातला आहे तो निर्णय न घेता सध्याच्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणीच इमारत बांधण्यात यावी अशी मागणी माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी पालकमंत्री खा.राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. दरम्यान यासंदर्भात पत्रात म्हटले आहे की, राहुरी येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम शहरापासून 4 कि.मी.अंतरावर असलेल्या बीजगुणन प्रक्षेत्राच्या जागेमध्ये करण्याचे शासनाने प्रस्तावित केलेले आहे. राहुरी हे तालुक्याचे मुख्यालय असून ठिकाणापासून इतक्या दुरच्या अंतरावर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्यास नागरिक, व्यापारीसह जनतेतून तीव्र विरोध आहे.वास्तविक राहुरी येथील सध्या असलेल्या तहसील कचेरीसाठी 3.60 हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे.या व्यतिरिक्त या ठिकाणी वनविभाग,गृहविभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस स्टेशन, पशुसंवर्धन विभाग या विभागांच्या नावावर जागा आहेत या सर्व जागांचे एकत्रीकरण केल्यास ही एकूण उपलब्ध होणारी 4 हेक्टरपेक्षा अधिक आहे शासनाच्या सर्व विभागासाठी प्रशासकीय इमारत होणार असल्याने प्रत्येक विभागास स्वतंत्र जागेची आवश्यकता नाही.अशा पद्धतीने सध्या अस्तित्वात असलेल्या जागेचे सातबारा सदरी एकत्रीकरण केल्यास ही इमारत तालुक्याचा मुख्यालयी बांधणे शक्य होईल. परंतु शासनाने बीजगुणन प्रक्षेत्राच्या जागेमध्ये इमारत बांधणे प्रस्तावित केले असल्याने या सर्वच स्तरातून विरोध होत असून याबाबत जनतेतून आंदोलन होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच राहुरी शहर हे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने त्याचबरोबर या ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असल्याने याच ठिकाणी इमारत बांधणे सोयीस्कर आहे. त्यामुळे शासनाने प्रस्तावित केलेल्या बीजगुणन प्रक्षेत्राच्या जागे ऐवजी सध्या असलेल्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणीच नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याबाबत आदेश देण्याची विनंती माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी नामदार विखे पाटील यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. उत्तर विभागीय उपसंपादक प्रशांत जोशी.. अँक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी. अहमदनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे