महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वर्पे यांचा उमेदवारी अर्ज दाखल …
खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दमदार इंट्रीने विरोधकांचे दणाणले धाबे .
मोठ्या जनसमुदायत. युवक, युवती, पुरुष व महिलां भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती रॅली…. 
कोपरगाव=(प्रतिनिधी) मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी चे उमेदवार संदीप वर्पे यांनी आपला उमेदवारी अर्ज खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीमध्ये दाखल केला.
शहरातील मेन रोड येथील विघ्नेश्वर मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडून रॅलीला सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून शहरातील मेन रोड वरून तहसील कचेरी पर्यंत भव्य अशी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे शहरातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी (राशप ) राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी एकजुटीने या रॅलीत सहभागी झाले होते ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती अर्ज दाखल केल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी सांगितले की कोपरगाव विधानसभा मतदार संघाची निवडणुकी महाराष्ट्रात रंगतदार होणार असून एकीकडे धनधांगडे व दुसरीकडे सर्वसामान्य असा उमेदवार आहे अहिल्यानगर दक्षिणची लोकसभेची पुनरावृत्ती कोपरगाव विधानसभा मतदार संघातहोणार असून संदीप वर्पे मोठ्या संख्येने विजयी होणार आहे पारनेर मतदार संघामध्ये 2019 ला जी परिस्थिती माझ्या मतदार संघात होती तीच परिस्थिती कोपरगाव विधानसभा मतदारसंघात असून कडवी झुंज देऊन संदीप वर्पे विजयी होणार यात शंका नाही आम्ही सर्व पक्षाचे नेते , शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात शिवसेना उभाठा पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते त्यांच्यासाठी एकजुटीने काम करणारा असून विजय खेचून आणू
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मतदारसंघातील मतदारांना आवाहन केले संदीप वर्पे सारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली असून मतदारांनी त्यांना निवडून आणावे
राशप पक्षाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सुतोवाचन केले की एका बाजूला मोठी धनशक्ती आहे व एका बाजूला एक सर्वसामान्य उमेदवार कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना कोल्हे नाही तर काळे ही नको वेळप्रसंगी आम्ही या मतदार संघात ठाण मांडू असे त्यांनी ठासून सांगितले या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये मोठा जनसमुदाय उपस्थित होता ही संदीप वर्पे यांच्यासाठी जेमेची बाजू आहे. तालुका प्रतिनिधी किसन पवार अँक्टिव्ह मराठी न्यूज. कोपरगाव.







