बारामती मध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा..

बारामती मध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा..
बारामती प्रतिनिधी:-९ मार्च २०२५ तू आदिशक्ती.. तुच प्रभूची भक्ती.. तुच मावळ्यांची भवानी, ‘तुच प्रयत्नांना लाभलेली उन्नती, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा, तुच आजच्या युगाची प्रगती. महिला दिनाचे अवचित्य साधत राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष विशाल पोपटराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी जाधव कार्यक्रमाचे आयोजन केले होते ते पुढे बोलताना म्हणाले की प्रत्येक क्षेत्रात काम करणारी महिला या जगाच रूप किती सुंदर प्रकारे बदलू शकते, हे आलेल्या सर्व महिलांना पटवून समजावत होते, महिला दिनाचे कोडकौतुक साऱ्यांना आजच्याच दिवशी असते का इतर दिवसही या महिलेमुळेच बघतोय ह्याचे भान हरवले का आज साऱ्यांनाच तिच्या कामाचे मनापासून कौतुक असते घरातल्या आणि घराबाहेरच्याही तिच्या कामाचे महत्व नसते, तिचे सौंदर्य, तिची बुद्धिमत्ता तिच्याकडे वात्सल्य तिची सामर्थ्यता सगळेच असे छान वाटते आजच्या या महिलादिनी सर्वांनाच ती महान वाटते. पण हाच आधार तिला प्रत्येक दिवशी देऊन बघा तिच्यातल्या या कालागुणांकडे रोजच थोडे आदराने बघा अरे झोपडीलाही स्वर्ग बनवण्याची तिच्याकडे हिंमत असते यामाचा ही पाठलाग करून ती सत्यवानाला जिवंत करते तिला खरंतर कुठल्याच कौतुकाची अपेक्षा नसते फक्त तिची दखल घ्यावी अशी मापक इच्छा मनात असते प्रत्येक क्षेत्रात तिने पाऊल टाकलंय तिचे पाऊल मागे खेचू नका तिला उघडण्यासाठी आभाळ हवं ते मात्र हिरावून घेऊ नका व सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती शहर महिलाध्यक्षा अनिताताई गायकवाड, छाया गावडे, रेहाना शेख, योगेश नालंदे, मन्सूर शेख, सचिन मोरे, शंकर घोडे, अमर अवघडे, अमर मिसाळ, या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. स्वच्छतेचे काम करणाऱ्या सर्व महिला भगिनींना अल्पहार देऊन त्यांचा मानसन्मान विशाल पोपटराव जाधव यांनी केला. पुणे जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.







