Breaking
ब्रेकिंगसामाजिक

नारळात कोरलेली विठ्ठलाची प्रतिमा अॅड. त्रिगुण गोसावी यांना भेट

0 1 4 7 2 7

नारळात कोरलेली विठ्ठलाची प्रतिमा अॅड. त्रिगुण गोसावी यांना भेट
| माळेगाव प्रतिनिधी १७ जुलै: नारळात कोरलेली श्री विठ्ठलाची प्रतिमा संत सोपानकाका महाराज पालखीसोहळा प्रमुख अॅड. त्रिगुण गोसावी यांना भेट देण्यात आली.व 1200,वारकरी भक्तांना इडली सांबर नाश्ता देण्यात आला माळेगाव येथील हरिभाऊ केदारी हे नारळात विविध कलाकृती निर्माण करतात. आतापर्यंत त्यांनी विविध महापुरुष, राजकीय नेते यांच्या प्रतिमा नारळात कोरल्या आहेत. त्यांनी श्री विठ्ठलाची प्रतिमा नारळात कोरलेली असून, माळेगाव येथे मुक्कामी आलेल्या संत सोपानकाका महाराज पालखीसोहळा प्रमुख अॅड. त्रिगुण गोसावी यांना भेट दिली. याप्रसंगी छाया केदारी, गणेश टकले, असिफ शेख, कुंदन यादव उपस्थित होते. या वेळी हरिभाऊ केदारी यांच्या या कलाकृतीचे अॅड. त्रिगुण गोसावी यांनी कौतुक केले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्यसभेचे खासदार सुनेत्रावहिनी पवार व शरदचंद्रजी पवार साहेब या सर्वांना हरिभाऊ केदारी यांच्या साईच्छा गिफ्ट शॉप कलाकृतीतून नारळात कोरलेल्या
मूर्ती भेट देण्यात आल्या आहेत व त्यांचं कौतुक केले आहे , हरिभाऊ जगन्नाथ केदारी यांच्या साईच्छा गिफ्ट शॉप मध्ये आयुष्य भेट द्या पत्ता आहे माळेगाव ग्रामपंचायत समोर तालुका प्रतिनिधी दत्ताजी चांदणे सह तालुका विभागीय संपादक किरण बोराडे अक्टिव्ह मराठी न्यूज बारामती,

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे