Breaking
ब्रेकिंगसामाजिक

साहित्यरत्नाला सलाम:डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी; अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन…!*

0 1 4 7 2 7

साहित्यरत्नाला सलाम:डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी; अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन…!*

बारामती (प्रतिनिधी) १८ जुलै .संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याचे काम अण्णा भाऊ साठे यांनी केले, म्हणुनच मराठी माणुस पेटुन उठला आणि त्यामुळेच मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली.
मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्रत्येक मराठी माणसाला मराठी असल्याचा स्वाभिमान अण्णाभाऊंनी पटवून चळवळ उभी केली. त्या काळात शाहीरी हे एक लोक चळवळीचे मोठे साधन होते म्हणूनच अण्णाभाऊ साठे अजरामर आहेत. आजही त्यांचे विचार मराठी माणसाला व चळवळीला प्रेरणादायी आहेत आजच्या दिवशी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. बिरजू मांढरे म्हणाले की पीडित, वंचित घटकच्या अन्यायला खरी वाचा फोडली ती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांनी, त्यांच्या कार्यामुळेच अन्याय दूर होण्यास चालना मिळाली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना ते बोलत होते.
यावेळी RPI पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनिल शिंदे, अशोकराव खंडाळे, मुख्याधापक उत्तम शिंदे, मुख्याधापक मोहन इंगळे सर यांनीही मनोगत व्यक्त केले
यावेळी पत्रकार निलेश जाधव, धनंजय तेलंगे, विशाल खंडाळे, पत्रकार किरण बोराडे, अंकुश मांढरे,विजय तेलंगे मयूर सुतार, ओंकार जाधव, तुषार शिंदे,सोमेश्वर सुतार अक्षय बोराडे ऋषिकेश मांढरे, स्वप्नील सुतार व अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तालुका प्रतिनिधी दत्ताजी चांदणे अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती.

5/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे