Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय तलाठी संतोष पवार वरती धारदार शस्त्राने हल्ला. करून जीवे मारले. सदर पोलीस स्टेशन ने 302 चा गुन्हा दाखल अद्याप केला नाही.

0 1 4 7 2 7

हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय तलाठी संतोष पवार वरती धारदार शस्त्राने हल्ला. निर्गुण  हत्या सदर पोलीस स्टेशन ने 302 चा गुन्हा दाखल अद्याप केला नाही.

हिंगोली प्रतिनिधी दि. ४ सप्टेंबर : हिंगोली जिल्ह्यातील तलाठी संतोष पवार यांची कार्यालयात धारधार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या झाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, गृहमंत्री देवेंद्रजी फडवणीस व महसूल मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांना बौद्ध समाजातील तलाठी मयत संतोष पवार यांच्या कुटुंबीयांची व पत्नीची लहान लेकरांची भेट घेण्यासाठी वेळ नाही. राज्य सरकार मधील मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्याकडे दोन मिनिटे वेळ काढून ट्विटर फेसबुक वर निषेध नोंदवण्यासाठी त्यांचे हात थरथरत आहेत.
सविस्तर माहिती अशी की 28/8/2024 रोजी संतोष पवार हे आडगाव येथील सज्जा वर बसलेले असताना दुपारी 12 च्या दरम्यान आरोपी प्रताप जगन्नाथ कराळे गाव बोरीसावंत हा तलाठी कार्यालयात आला. व हातातील चाकूने तलाठी संतोष पवार यांच्या पोटात चाकू खुपसला दवाखान्यात उपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याबाबत हट्टा पोलीस स्टेशनमध्ये
गुन्हा रजी नंबर 0398/2024, बी.एन. एस 132,121(2),118(1),103(1), अनुसूचित जाती-जमात्या अत्याचार प्रतिबंधक कायदा तीन दोन व्ही ए,तीन दोन पाच नुसार गुन्हा दाखल आहे.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस एन.डी.एम.जे महाराष्ट्र टीम या घटनेचा निषेध तर करत आहेच पण आरोपीला शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आमची मराठवाडा व हिंगोलीतील मयत संतोष पवार यांच्या कुटुंबियांना पण दिला व लहान लेकरांना भेटलेली आहे. कुटुंबियांचे सांत्वन करून आरोपींना कडक शीक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे
घोषणा मराठवाडा अध्यक्ष जगदीप दिपके,दलित दीपके व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन केली आहे.
मयत संतोष पवार यांच्या पत्नीचे व लहान लेकरांचे दुःख आभाळ एवढे असून कमावत्या पत्नीच्या जाण्याने कुटुंबीयांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड. डॉ.केवल ऊके,राज्य सचिव वैभवजी गीते, राज्य सहसचिव
पी.एस खंदारे यांच्या मार्गदर्शनामध्ये मराठवाडा व हिंगोली टीम पीडित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय उच्च अधिकार दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेतलेली नाही. तसेच मंत्रालय स्तरावर ॲट्रॉसिटी ॲक्ट च्या अंमलबजावणीसाठी नोडल ऑफिसर हर्षदीप कांबळे (IAS) प्रधान सचिव उद्योग व ऊर्जा विभाग यांनी देखील दोन वर्षांच्या काळात एकही बैठक घेउन उपययोजना केल्या नसल्याने
बौद्ध,मातंग,चर्मकार होलार, पारधी यांच्यासह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दलित आदिवासींवर होणाऱ्या अन्याया अत्याचारामध्ये भरघोस वाढ झाली असून गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळेच आरोपींचे जातीयवाद्यांचे मनोबल वाढले असून दिवसाढवळ्या बौद्ध दलित आदिवासींचे मुडदे पाडले जात आहेत.
राज्य शासनाने अनुसूचित जाती जमाती आयोगाला अध्यक्ष व सदस्य नेमलेला नसल्याने पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी सरकारी वकील यांचा आढावा व अहवाल घेण्यासाठी राज्यात अनुसूचित जाती जमाती आयोग अस्तित्वात आहे परंतु आयोगाला अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्ती नसल्याने हा आयोग असून नसल्यासारखा आहे. असे मत राज्यसचिव वैभव तानाजी गीते यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
*बारामती विभागीय संपादक :-केदार पाटोळे. सह किरण बोराडे हिंगोली जिल्हा विभागीय संपादक पांडुरंग कतूरे अँक्टिव्ह मराठी न्युज. बारामती. व हिंगोली.

4/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे