Breaking
ब्रेकिंगसामाजिक

दलित मातंग समाजाचे लहांडे कुटुंबाला धारदार शस्त्राने हल्ला आरोपी फरार. राहुरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक साहेब व माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन सादर…. सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेची आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी.

0 1 4 7 2 7

दलित मातंग समाजाचे लहांडे कुटुंबाला धारदार शस्त्राने हल्ला आरोपी फरार.
राहुरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक साहेब व माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन सादर….
सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेची आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी.
राहुरी (प्रतिनिधी) 15 सप्टेंबर सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड व तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगधने व त्याचप्रमाणे तालुका संघटक संदीप जगधने यांच्या नेतृत्वाखाली मौजे कनगर तालुका राहुरी या ठिकाणी मातंग समाजाच्या महिलांवर व पुरुषांवर अमानुषपणे धारदार शस्त्राने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेचा निषेध व्यक्त करून आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी राहुरी तालुका सकल मातंग समाज व सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने राहुरी पोलीस स्टेशनला व राहुरी तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी राहुरी शहरात असलेल्या संत गाडगेबाबा आश्रम शाळेत पासून सुरुवात करून नगर मनमाड हायवे नवी पेठ शनि चौक व स्टेशन रोड मार्गे मोर्चाचे स्वरूप देऊन निवेदन देण्यात आले सविस्तर माहिती अशी आहे की राहुरी तालुक्यातील मातंग समाजातील महिला सौ संगीता राधाकिसन लाऊंडे यांनी दिनांक 9 .9.2024 रोजी सदर आरोपी विकास गोसावी व संपत उर्फ गणेश गोसावी यांच्याविरुद्ध शेतीच्या वादावरून राहुरी पोलीस स्टेशनला येऊन अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता याचा राग मनात धरून दिनांक 10 9 2024 रोजी विकास गोसावी व संपत उर्फ गणेश गोसावी व त्यांचे इतर साथीदार यांनी सदर दलित कुटुंबास अमानुषपणे मारहाण केली होती संपूर्ण घटनेची माहिती समजतात सत्यशोधक लहुजी क्रांती सेना व सकल मातंग समाजाचे कार्यकर्ते यांनी दिनांक 10.9.2024 तारखेला राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन संबंधित आरोपीवर गुन्हे दाखल केले आहेत या घटनेला उलटून पाच ते सहा दिवस झाले आहे तरी देखील अद्याप आरोपी अटक झालेली नाही यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यातील सत्यशोधक लहुजी क्रांती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब व नायब तहसीलदार दळवी मॅडम यांना निवेदन देऊन सदर आरोपी लवकरात लवकर अटक नाही झाले तर येत्या काही दिवसातच भव्य स्वरूपाचा जन आक्रोश मोर्चा पुन्हा आपल्या कार्यालयावर आणण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले यावेळी उपस्थित सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने त्याचप्रमाणे राज्य प्रवक्ते निलेश जगधने राज्य महासचिव सतीश बोरुडे जिल्हा अध्यक्ष नंदू भाऊ शिंदे राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड राहुरी तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगधने राहुरी तालुका संघटक संदीप जगधने अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगधने राज्य प्रवक्ते सुनील बोरुडे नगर तालुका अध्यक्ष नवनाथ जाधव सचिन नन्नवरे बाबाजी जगधने विलास बोरुडे शरद लोखंडे नितीन मोरे बहुजन युथ पँथर राहुरी तालुका अध्यक्ष चंद्रकांत जगधने देसवंडी शाखा अध्यक्ष सुनील जगधने तालुका प्रसिद्धीप्रमुख आकाश बोरूडे राहुरी शहराध्यक्ष विलास जगधने सामाजिक कार्यकर्ते आशाताई दिनकर बाबुराव चव्हाण निलेश पवार गणेश जगधने संकेत थोरात सागर चांदणे प्रल्हाद ससाने कल्याण तात्या जगधने वैभव जगधने लक्ष्मण गायकवाड पप्पू तोरणे प्रकाश लवंडे शरद लोखंडे आदी सह समाजातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पीडित कुटुंब यांच्या हाताने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब व नायब तहसीलदार दळवी मॅडम यांना निवेदन देण्यात आले. उत्तर विभागीय संपादक दत्ताजी जोगदंड अँक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी.अ.नगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे