Breaking
ब्रेकिंगराजकियसामाजिक

आगडगाव येथे महाराष्ट्र राज्य  ग्रामसेवक संघाची राज्यस्तरीय बैठक संपन्न .

0 1 4 7 2 7

अगडगाव येथे महाराष्ट्र राज्य  ग्रामसेवक संघाची राज्यस्तरीय बैठक संपन्न .

.नगर. टाकळी खातगांव (प्रतिनिधी) दि.20 सप्टेंबर- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ कोल्हापूर या संघटनेच्या राज्य कार्यकारणी बैठक राज्याध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आगडगाव देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष श्री कराळे साहेब व माजी राज्याध्यक्ष विजय ची म्हस्कर विश्वस्त श्री चंद्रकांत खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १६/९/२०२४ रोजी काळभैरव देवस्थान ट्रस्ट आगडगाव तालुका नगर या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीमध्ये क प्रामुख्याने २०१४ पासून संघाचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी दोघांचे एक पद करणे बाबत केलेल्या प्रयत्नात आता मुहूर्त स्वरूप येत आहे असून त्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करण्याचे ठरले आहे ग्रामसेव काचा जॉब चार्ट निश्चित करून जॉब चार्ट प्रमाणे कामे करून अतिरिक्त कामाचा बोजा कमी करणे बाबत ठराव संमत करण्यात आला ग्रामसेवकांच्या नियमित कामे बाजूला राहून इतर विभागाचे कामे जास्त प्रमाणात येत असल्यामुळे ग्रामसेवकांच्या मूळ कामाकडे लक्ष देण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्याचे आजच्या सभेत ठरले विस्तार अधिकाऱ्यांची ५०५ पदे निर्मिती बाबत पाठपुरावा करण्यात आजच्या सभेत ठरले विविध जिल्ह्यातून आलेल्या ग्रामसेवक बंधू भगिनींच्या अडीअडचणी बाबत ठरले ग्रामसेवकांमधून विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती झालेल्या ग्रामसेवकांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या राज्य कार्यकारणी मध्ये रिक्त पदावर नियुक्त करण्यात आल्या अहमदनगर जिल्ह्यातून विद्यमान अध्यक्ष कुंडलिक भगत यांची पदोन्नती करून राज्य कोषाध्यक्ष या पदावर नियुक्त करण्यात आली ग्रामसेवकांच्या अडीअडचणी व संघाच्या भक्कम वाटचालीसाठी तसेच रिक्त पदांच्या बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी राज्य सरचिटणीस एस डी पाटील कार्याध्यक्ष सागर मोकाशी उपाध्यक्ष सागर सरवणे ए आर गायकवाड सचिव अनिल जगताप आधी कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ ट्रस्टी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे