Breaking
कृषीवार्ताब्रेकिंगसामाजिक

आधुनिक कृषी अवजारांबद्दल शेतकऱ्यांनी जागृत रहावे _ मा. आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील. कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने येथे रब्बी हंगाम व कांदा पिक कार्यशाळा संपन्न.

0 1 4 7 2 7

आधुनिक कृषी अवजारांबद्दल शेतकऱ्यांनी जागृत रहावे _ मा. आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील.
कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने येथे रब्बी हंगाम व कांदा पिक कार्यशाळा संपन्न.

शेवगाव (प्रतिनिधी) दिनांक :23 सप्टेंबर
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने येथे सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी रब्बी पिके व कांदा कार्यशाळा संपन्न झाली . कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मा. आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर मजुरांची उपलब्धता ही गंभीर समस्या असून त्यावर मात करण्यासाठी कृषी अवजारांच्या वापराबद्दल शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक जागरूक रहावे व त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची मदत घ्यावी असे आवाहन उद्घाटन प्रसंगी केले.
कृषी विज्ञान केंद्र स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने दिनांक 23 ते 28 सप्टेंबर या कालावधीमध्ये कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचाच भाग म्हणून केव्हिके दहिगाव येथे रब्बी हंगाम व कांदा उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने यांच्या गत 12 वर्षांमधील उपलब्धतेबाबत व कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने कांदा, तूर, सोयाबीन इ. पिकांचे बिजोत्पादन, उस, फळे पिके व भाजीपाला रोपवाटिका, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, देशी गाई, शेळी व कुक्कुटपालन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, नैसर्गिक शेती, जैविक खते व कीडनाशके प्रयोगशाळा, विविध पिकांचे मोबाईल ॲप, शेतकरी उत्पादक कंपनी मधील योगदान व मोबाईल द्वारे शेतकऱ्यांना संदेश या प्रमुख उपलब्धी बाबत माहिती दिली. तसेच डॉ. कौशिक यांनी रब्बी हंगामातील प्रमुख पिके जसे ज्वारी हरभरा व पूर्व हंगामी ऊस लागवड याबद्दल देखील उपस्थिती शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. श्री नंदकिशोर दहातोंडे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या ) यांनी रब्बी हंगामातील कांदा पिकाबद्दल मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने रब्बी हंगामासाठी कांद्याच्या जातींची निवड व रोपवाटिका व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांकडून होणाऱ्या चुका व त्याचे शास्त्रीय व्यवस्थापन याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले. श्री माणिक लाखे यांनी कांदा पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री मिलिंद नाना कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव ने हे आता परिसराचे वैभव असल्याचे नमूद केले व आपले स्वतःचे कांदा उत्पादनामधील अनुभव कथन केले. यावेळी ग्रामीण युवक युवतींसाठी ‘कृषि प्रक्रिया व मूल्यवर्धन’ तसेच ‘मुक्तसंचार गोठा व दुग्ध उत्पादन व्यवस्थापन’ या विषयावरील प्रशिक्षण वर्गात सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, भेंडाचे संचालक श्री दादासाहेब गंडाळ, दहिगाव ने चे उपसरपंच श्री राजाभाऊ पाऊलबुद्धे, माजी सरपंच श्री सुभाष नाना पवार, रांजणी चे सरपंच श्री काकासाहेब घुले, कडूबाळ घुले हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र कडील उपलब्ध सुविधा व तंत्रज्ञान एकाच ठिकाणी अवगत होण्याच्या दृष्टीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केव्हीके चे श्री नारायण निबे, श्री सचिन बडधे, डॉ. चंद्रशेखर गवळी, श्री प्रकाश हिंगे, श्री प्रकाश बहिरट, श्री प्रवीण देशमुख, श्री संजय थोटे, श्री अनिल धनवटे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन इंजिनियर राहुल पाटील यांनी केले श्री. माणिक लाखे यांनी आभार मानले. तालुका प्रतिनिधी प्रवीण देशपांडे मराठी न्यूज. दहिगावणे.शेवगाव.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे