बारामती शहरात पोलिस चौकीची मागणी. बारामती (प्रतिनिधी) दिनांक 3 ऑक्टोंबर बारामती शहर पोलीस स्टेशनची नवीन इमारत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नसून मुख्य बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय आणि रहिवासी भागापासून देखील दूर आहे. पूर्वी असलेली पोलीस स्टेशनची इमारत मध्यवर्ती ठिकाणी होती व दिवस-रात्र पोलिसांची वर्दळ शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर असायची आणि त्यामुळे बारामतीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आता आहे इतका गंभीर नव्हता. यापूर्वी मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन शहरात पोलीस चौकीची मागणी केलेली होती परंतु त्यांनी अद्याप त्यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही. सध्या बारामती शहरात वाढलेले चोरी इत्यादी गुन्हे लक्षात घेता शहरात एक पोलीस चौकी असणे आवश्यक आहे आणि तशी मागणी शहरातील अनेक नागरिक, व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उद्याच तशी मागणी करण्यात येणार आहे आणि बारामतीकर जनतेने देखील या मागणीला पाठिंबा द्यावा. अँड. सुधिरजी पाटसकर. बारामती शहर विभागीय संपादक:-केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज बारामती.
0
1
4
7
2
7
0
1
4
7
2
7







