बारामती मध्ये बेमुदत धरणे आंदोलन.
बारामती(प्रतिनिधी)दि.१०ऑक्टोंबर दि.२४/०२/२०२३ रोजी शासन निर्णय नुसार रोजंदारी वरील सफाई कामगार यांच्या वारसांना पुन्हा लाड समितीच्या शिफारशीप्रमाणे नोकरी मिळण्यासाठी
* दि :- ०७/१०/२०२४ रोजी पासुन स्थळ :- बारामती नगरपरिषद समोर, बारामती
बेमुदत धरणे आंदोलन चालु आहे.
* प्रमुख मागण्या:- बारामती नगररिषदेमध्ये सन १९९३ पुर्वी च्या रोजंदारीवरील शासकीय नियमानुसार नियमित झालेल्या सफाई कामगार यांना दि. २४/०२/२०२३ रोजी शासन निर्णय ३ मधील तरतुदी नुसार सफाई कामगार यांच्या वारसांना पुन्हा लाड समितीच्या शिफारशीप्रमाणे नोकरी देणे बंधनकारक आहे. परंतु प्रशासन जाणीवपुर्वक रोजंदारी वरील सफाई कामगार यांच्या वारसांना नोकरी देण्यास टाळाटाळ करत असल्याने बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत.
* आंदोलक :- बारामती नगरपरिषद बारामती रोजंदारी वरील सर्व सफाई कर्मचारी *बारामती विभागीय संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज. बारामती.







