Breaking
ब्रेकिंगसामाजिक

हिंगोली विधानसभा आयकॉन पदी दलितमित्र डॉ.विजय निलावार ह्यांची नियुक्ती.

0 1 4 7 2 7

*हिंगोली विधानसभा आयकॉन पदी दलितमित्र डॉ.विजय निलावार ह्यांची नियुक्ती*

वसमत. (प्रतिनिधी).दिनांक 15 आक्टोबर
हिंगोली (९४) विधानसभा आयकॉन पदी ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र शासनाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कारार्थी डॉ.विजय निलावार तसेच राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी एम एम राउत ह्यांची नियुक्ती हिंगोली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा हिंगोली चे उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे ह्यांनी केली.ह्या संदर्भातील लेखी आदेश व नियुक्ती पत्र त्यांनी हिंगोली उपविभागीय कार्यालयात सन्मानपूर्वक डॉ. निलावार व एम एम राऊत ह्यांना देवून नियुक्ती ची फलश्रुती आणि उद्दिष्ट्य पूर्ती प्रशासकीय व निवडणूक विभागाच्या पाठबळाने करावी त्यासाठी रीतसर सहकार्य व मार्गदर्शन केले जाईल अशी ग्वाही हिंगोली विधानसभा संघ निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे ह्यांनी दिली .ह्या प्रसंगी हिंगोली चे तहसीलदार श्रीकांत भुजबळ ,उपशिक्षण अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी नितीन नेटके, स्वीप पथकातील सदस्य , श्याम स्वामी, विनोद चव्हाण, राजकुमार मोरगे ,सुदर्शन सोईतकर माणिक ढोखळे हे उपस्थित होते.प्रशासनाकडून रीतसर मदत देवून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी गाव पातळीवर मतदार जनजागृती साठी जे जे रीतसर व कायदेशीर करता येईल ते ते करणे आणि करवून घेण्यासाठी आयकॉन मंडळी व ह्या युनिट मधील यंत्रणा ने सज्ज राहावे आणि निवडणूक निर्णय अधिकारी हिंगोली विधानसभा मतदार ,स्वीप नोडल अधिकारी आदी समवेत समन्वय राखावा अस तहसीलदार भुजबळ ह्यांनी म्हंटल.आदेशा नुसार सर्व कार्य पार पाडण्यासाठी आम्ही व टीम प्रयत्नांची पराकाष्टा करू अस अभिवचन आयकॉन डॉ.विजय निलावार एम एम राऊत,व उपशिक्षण अधिकारी नेटके ह्यांनी दिलं.डॉ.विजय निलावार हे ज्येष्ठ पत्रकार व नॉन पॉलिटिकल सोशल वर्कर असून ते आकाशवाणी दूरदर्शन प्रसार भारती चे सेवानिवृत्त प्रतींनीधी व महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र समाजभूषण संघ ह्या राज्यस्तरीय सेवाभावी संघाचे राज्यकार्याध्यक्ष व शासन कडून सन्मानित समाजसेवक आहेत.त्यांनी मागील चार दशकात पत्रकारिता आणि समाजसेवेत उलेखनिय कामगिरी बजावून मतदार जन जागृती अभियान, संत गाडगे बाबा ग्राम व नागरी स्वच्छता अभियान राष्ट्रीय अंधत्व ,कुष्ठ रोग,एड्स निर्मूलन,साक्षरता अभियान, महाराष्ट्र मानव विकास मिशन अभियानात सेवा दिल्या असून अश्याच सेवा एम.एम.राऊत ह्यांनी दिल्याने त्यांचा ही गौरव महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते झाला असल्याने प्रशासनाने दाखल घेवून नियुक्ती केल्याचे सांगण्यात आले.सदरील निवडी बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे.
ब्युरो रिपोर्ट अनिल मुगुटकर, ॲक्टिव्ह मराठी न्यूज, वसमत हिंगोली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे