Breaking
ब्रेकिंगसामाजिक

समाजाला दिशा दाखवण्याचे काम ग्रंथ करतात – गौरी जोशी

0 1 4 7 2 7

समाजाला दिशा दाखवण्याचे काम ग्रंथ करतात . निवेदिता ,कथा, कथनकार : गौरी जोशी

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुले ही अनुकरण प्रिय असतात. आपल्या पालकांचे ते अनुकरण करतात. आणि आपणच जर लहानपणी मुलांना वाचनाची गोडी लावली तर पुढची पिढी वाचन करून सुसंस्कृत होईल आणि समाजाला दिशा मिळेल. त्यासाठी आपण घरात ग्रंथ आवर्जून ठेवावेत. समाजाला दिशा दाखविण्याचे काम ग्रंथ करतात असे प्रतिपादन प्रसिद्ध निवेदिका साहित्यिक, कथाकथनकार सौ. गौरी जोशी यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहिल्यानगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांसाठी कथाकथन शिबिराचे व घेवू या एकच वसा मराठीला बनवू ज्ञानभाषा या संकल्पनेवर ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सौ.गौरी जोशी यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच ग्रंथ प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालय, भूतकरवाडी या शाळेच्या शिक्षिका ताकटे मॅडम उपस्थित होत्या. तर प्रमुख अतीथी ऑडीटर संतोष वाडेकर व अहिल्यानगर जिल्हा मराठा प्रसारक पतसंस्थेचे संस्थापक सदस्य, लक्ष्मण सोनाळे उपस्थित होते.
सौ.गौरी जोशी यांनी कथाकथन कसे करावे, आपले हावभाव कसे असावे. इत्यादी पैलू स्पष्ट करून ‍विविध कथांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांचे मनोरंजन व प्रबोधन केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांनावाव देण्यासाठी विद्यार्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले विद्यार्थ्यांनीही कथा कविता गाणी सादर कली . या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ग्रंथालय निरीक्षक रामदास शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन लिपीक संतोष कापसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लिपीक शैलेश घेगडमल व ऋषीकेश जायभाये यांनी विषेश परीश्रम घेतले.अँक्टिव्ह मराठी न्यूज.अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे