नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांवर राहुरी पोलिसांची कारवाई..
उत्तर विभागीय उपसंपादक प्रशांत जोशी ॲक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी अहिल्यानगर


नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांवर राहुरी पोलिसांची कारवाई..
राहुरी शहर प्रतिनिधी नाना जोशी दिनांक 24 डिसेंबर.. राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे बंदी घालण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची खबर मिळताच राहुरी पोलिस पथकाने दि.18 डिसेंबर रोजी संध्याकाळच्या वेळी छापा टाकून कारवाई केली.त्यावेळी पोलिस पथकाने नायलॉन मांजा जप्त करून दोघा जणांना ताब्यात घेतले.राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे बंद असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची खबर मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहुल यादव, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे आदी पोलीस पथकाने दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान राहुरी खुर्द येथील राजेश्वर कॉलनीतील अक्सा मज्जिद जवळ छापा टाकला. पोलीस पथकाने त्या ठिकाणी झेडपी घेतली असतात तेथे 2500 रुपये किंमतीचा बंदी असलेला नायलॉन मांजा आढळून आला. पोलीस पथकाने सदर मुद्देमाल जप्त केला. तसेच मांजा विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. पोलीस शिपाई नदी मोहम्मद जफर शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुज्जमिल अफजल पठाण,वय वर्षे 21 व सुजित सुधाकर बोर्डे,वय वर्षे 18 दोन्ही रा.राजेश्वर काॅलनी, राहुरी खुर्द,ता.राहुरी,या दोघांवर गुन्हा रजि.नं.1294/2024 पर्यावरण ( संरक्षण ) अधिनियम 1986 चे कलम 15,5 व भारतीय न्याय संहिता कलम ( बी एन एस ) 2023 कलम 125,223 ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी. अहिल्यानगर







