बारामती मध्ये लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन*.

बारामती मध्ये लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन*.

बारामती प्रतिनिधी: दि १५ नोव्हेंबर २०२४ अद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३० व्या जयंती निमित्त साठेनगर कसबा बारामतीमध्ये. क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती महोत्सव समिती साठेनगर यांच्या वतीने हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी समाज बांधव मोठ्या संख्येणे उपस्थित होता. या प्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. कुणालजी दंडवते म्हणाले की लहुजी वस्ताद यांचे योगदान या भारत देशासाठी खुप मोठे आहे. आणि त्यांनी या देशासाठी ब्रह्मचर्याचे पालन करत देश सेवा केली . जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी अशा प्रकारे शपथ घेऊन या भारत देशात हजारो क्रांतिकारक तयार केले गेले. त्यांनी या देशासाठी दिलेला लढा आपल्याला विसरता येणार नाही. विशाल जाधव म्हणाले की लहुजी वस्ताद यांनी मुली शिकल्या पाहिजेत म्हणून लहुजी वस्ताद सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर अंगरक्षक म्हणून त्याच्या पाठिशी उभे राहिले. तसेच महात्मा फुलेनां देखिल लहुजी वस्ताद यांनी त्यांना शाळा सुरु करण्यास मोलाचे योगदान दिले. कित्येक क्रांतिकारक लहुजी साळवे यांनी आपल्या गंजपेठ पुणे तालमी मध्ये तयार केले. साधु बल्लाळ यांनी देखिल आपल्या मनोगतामध्ये समाज बांधवांना लहुजी वस्ताद यांचे कार्य पटवून सांगितले. युवकवर्गांनी लहुजी वस्ताद यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवले पाहिजेत असे सांगुन समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बारामती नगरीचे माझे उपनगरअध्यक्ष विजय खरात,संजय भोसले, विक्रम लांडगे, सुरेश अवघडे, अजय खरात, केदार पाटोळे व समाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर जाधव, नंदु खरात, दत्ता खरात, अँड. अमृत नेटके, रुपेश खरात, व त्याचे सहकारी यांनी परिश्रम घेतले.
बारामती विभागीय संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.







