विस्टोन कंपनी मुंबई व दिव्यांग शक्ती सेवा संस्था वतीने जयपुर फूट व कॅलिबर मोजमाप शिबिर संपन्न.

विस्टोन कंपनी मुंबई व दिव्यांग शक्ती सेवा संस्था वतीने जयपुर फूट व कॅलिबर मोजमाप शिबिर संपन्न.

राहुरी (प्रतिनिधी) दि .२७ नोव्हेंबर – विस्टोन कंपनी मुंबई व दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी तथा राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ब्रँडेड कंपनीचा इम्पोर्टेड कृत्रिम पाय व कॅलिबर मोजमाप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अ.नगर येथील राजेंद्र शिंदे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे होते प्रास्ताविक तालुकाध्यक्ष योगेश लबडे यांनी केले. सूत्रसंचालन संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडे यांनी केले कंपनीच्या वतीने आलेले शेरसिंग राठोडसाहेब यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन केले यावेळी 30 दिव्यांग बांधवांना ब्रँडेड जयपूर फूट कॅलिबर्स व्हीलचेअर व इतर साहित्याचा लाभ मिळण्यासाठी मोजमाप शिबिराचे आयोजन गाडगेबाबा आश्रम शाळा राहुरी येथे करण्यात आले. यावेळी असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी संजय देवरे यांनी दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या वतीने आभार मानले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी मधुकर घाडगे
* *सलीम भाई शेख योगेश लबडे रवींद्र भुजाडी संजय देवरे संदीप कुलकर्णी भागवत साळुंखे अशोक वलमे यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी दत्ता जोगदंड अँक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी.







