श्रीरामपूर येथे भारतीय लहुजी सेनेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे वीर लहुजी वस्ताद जयंती साजरी

श्रीरामपूर येथे भारतीय लहुजी सेनेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे वीर लहुजी वस्ताद जयंती साजरी
उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना पुरस्कार देऊन केला सन्मान. —
श्रीरामपूर (प्रतिनिधी) सुधीर चव्हाण. दिनांक 3 डिसेंबर श्रीरामपूर येथे भारतीय लहुजी सेनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे क्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद यांची २३० जयंती साजरी करण्यात आली.भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..
श्रीरामपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील प्रांगणात झालेल्या वीर लहुजी वस्ताद जयंती व पुरस्कार वितरण सोहळयाच्या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यक्रम करणाऱ्या व्यक्तींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.प्रमाणपत्र,समानचिन्ह,श्रीफळ,पुष्पहार शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्ष अनुराधाताई आदीक,नगरसेवक राजेश अलक गुरूनानाक मार्केटचे अध्यक्ष राजकुमार बत्रा,आरपीआय जिल्हा प्रमुख सुरेंद्रभाऊ थोरात,तालुका प्रमुख विजय पवार,सुभाष त्रिभुवन,संतोष मोकळ,शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सलमान पठाण,पुंडलीक खैरे,जगधने, राजेंद्र आल्हाट वनविभागाचे मिसाळ,मोहन आव्हाड, भारतीय लहुजी सेनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, महिला आघाडी मार्गदर्शक सौ.स्वातीताई बागुल,राष्ट्रीय सचिव हानिफभाई पठाण,राज्य प्रमुख सुरेश आढागळे,जिल्हा प्रमुख रज्जाकभाई शेख,कायदेशिर सल्लागार ॲड.रमेशभाऊ कोळेकर,राजेंद्र त्रिभूवन,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख
कार्याध्यक्ष शांतवन खंडागळे,भाऊसाहेब आव्हाड,शुभम बागुल,भारतीय लहुजी सेना महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ.मंगलताई चव्हाण ज्योतीताई भोसले या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले
या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते मंडळी,सर्व धर्मीय नागरिक,भारतीय लहुजी सेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते हितचिंतक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित
होते. तालुका प्रतिनिधी सुधीर चव्हाण अक्टिव्ह मराठी न्यूज श्रीरामपूर.
प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा







