Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर द्यावा : डॉ. मीना पाटील..

तालुका प्रतिनिधी नरहरी शहाणे अँक्टिव्ह मराठी न्यूज शेवगाव. क्टिव्ह मराठी न्यूज शेवगाव

0 1 4 7 2 7

विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर द्यावा : डॉ. मीना पाटील..

ॲक्टिव्ह मराठी. (तालुका प्रतिनिधी) नरहरी शहाणे .दि. 28 फेब्रुवारी. शेवगाव येथील न्यू आर्ट्स,कॉमर्स सायन्स महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने संभाजी नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या माजी प्राध्यापिका डॉ.मीना पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या. डॉ. पाटील यांनी अश्मयुगापासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतचा मानव विकास यावर विशेष भर दिला व मुलांनी संशोधनामध्ये आपले करिअर केले पाहिजे असे मत मांडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी मुलांना संशोधन कार्यात सहभाग घ्या आणि देश विकासात सहभाग घ्या असे आवाहन केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात सायन्सवर क्वीझ कॉम्पिटिशन तसेच मॉडेल प्रेझेंटेशन घेण्यात आले. यात मुलांनी अतिशय उत्साहात सहभाग दर्शविला. या मॉडेल प्रेझेंटेशनचे परीक्षण प्रा.सुशील कुमार शिंदे, प्रा. फलके शालिनी, प्रा. सोनाली उगले, प्रा.संतोष उगलमुगले तसेच प्रा. सचिन पवार यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके व महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन पवार यांनी केले तर आभार डॉ. छाया भालशंकर यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक डॉ. छाया भालशंकर डॉ. उषा शेरखाने प्रा. वळवी राजेश, प्रा. सुशील कुमार शिंदे तसेच इतर सहकारी प्राध्यापक यांनी केले. तालुकाप्रतिनिधी नरहरी शहाणे अँक्टिव्ह मराठी न्यूज. शेवगाव.

4/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे