Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

राहुरी नगर पालिकेच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण अभियान संपन्न..

राहुरी शहर (अँक्टीव्ह मराठी)दि.११मे ,(प्रतिनिधी) उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी राहुरी..

0 1 4 7 2 7

 

राहुरी नगर पालिकेच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण अभियान संपन्न..
राहुरी शहर (अँक्टीव्ह मराठी)दि.११मे ,(प्रतिनिधी) उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी राहुरी..
राहुरी नगरपालिका महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियान जिल्हास्तर योजना सन 2021-22 अंतर्गत तनपुरे खळवाडी येथे अंतर्गत बंदिस्त गटार व रस्ता कॉंक्रीटकरण रक्कम 19 लाख 34 हजार 300रू रकमेचा विकास कामाचा उद्घाटन राहुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राहुरी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्री दशरथ एकनाथ पोपळघट, राहुरी नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ श्री धनंजय मेहेत्रे त्याचप्रमाणे राहुरी शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती वाय.स तनपुरे, माजी नगरसेवक नंदकुमार तनपुरे, माजी नगरसेवक रावसाहेब शंकर तनपुरे,एमपी सोसायटीचे व्हॉइस चेअरमन सुभाष सुधाकर तनपुरे, वैभव तनपुरे, ऋषी तनपुरे, राहुरी नगरपालिकेचे माजी आरोग्य आधिकारी भास्कर अल्लाट साहेब, माजी नगरसेवक प्रकाश भुजाडी, वंचित बहुजन आघाडीचे नेते निलेश जगदने,ज्येष्ठ नागरिक सोपान किसन तनपुरे, अविनाश तनपुरे,मोहम्मद भाई आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी माजी उपसभापती श्री वाय एस तनपुरे यांनी सर्व तनपुरे खळवाडी नागरिकांच्या वतीने राहुरी नगरपालिकेचे व डॉ. सौ उषाताई तनपुरे यांचे आभार मानले. अनेक वर्षापासून मागणी असलेल विकासकाम पूर्ण झाल्याने संपूर्ण तनपुरे खळवाडी नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अँक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे