Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

वसमत येथील झेंडा चौकात भीषण अपघात .

वसमत विभागीय उपसंपादक अनिल कुमार मुगुटकर अँक्टिव्ह मराठी न्यूज. वसमत

0 1 4 7 2 7

वसमत येथील झेंडा चौकात भीषण अपघात .
वसमत. (प्रतिनिधी). दिनांक 23 डिसेंबर
वसमत शहरातील गजबजलेल्या झेंडा चौकात काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये एका चार चाकी चालकाने एका इसमाला धडक दिल्याने सदरील इसम गंभीर जखमी झाला आहे.
येथील मुख्य असलेल्या झेंडा चौकात नेहमी गर्दी असते. परंतु याकडे नगरपालिकेचे डोळे झाक चालू आहे. कोणते प्रकारचे अतिक्रमण अधिकाऱ्याचे या चौकात नियंत्रण मुल्ला मार्ग नसल्याचे दिसून येत आहे. काल रात्री थंडी मुळे बाजारपेठ बंद असताना अचानक एक चार चाकी वाहन वेगाने जनरल स्टोअर्स समोरील बाजूस जोरदार धडकले. यावेळी हे वाहन एका इसमाच्या अंगावरुन गेल्याने सदरील इसम गंभीर जखमी झाला असून त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.यापुर्वी या वाहनाने दोन दुचाकी सह काही फुले विक्री दुकानांचीही नासधुस केल्याची प्राथमिक माहिती आहे. गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला असावा अशी चर्चा होती. घटनेनंतर स्थानिक पोलीसांनी जागेवर जाऊन तपास सुरू केला आहे. तरी हा रस्ता चौकात कोणत्याही प्रकारचे डिव्हायडर नाहीत फुटपाट नाही रोडमध्ये अतिक्रमणाचा वेळ का असल्याने असे प्रकार घडतच राहणार असे दिसत आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर नगरपालिका, प्रशासन नेमके काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले.आहे.
ब्युरो रिपोर्ट, अनिल मुगुटकर, अँक्टिव्ह मराठी न्युज, वसमत, हिंगोली .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे