गणेश रमेश पुरूषोत्तम यांना गुणवंत दिव्यांग कर्मचारी हा पुरस्कार जाहिर

गणेश रमेश पुरूषोत्तम यांना गुणवंत दिव्यांग कर्मचारी हा पुरस्कार जाहिर

शेवगाव (प्रतिनीधी (लक्ष्मण मडके ) दि.5 डिसेंबर .महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने जागतिक अपंग दिना निमित्त शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश रमेश पुरूषोत्तम यांना गुणवंत दिव्यांग कर्मचारी हा पुरस्कार जाहिर झाला असून उद्या मंगळवारी ( दि. ३) रोजी अहिल्यानगर येथे संघटनेच्या अधिवेशनात पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप यांनी दिली.
गणेश पुरूषोत्तम हे अल्पदृष्टी दिव्यांग असून त्यांची १८ वर्षे शेवगाव मधील कांबी व बालमटाकळी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केली आहे. तर पदोन्नतीने सन २००० पासून जिल्हा परिषदेच्या हातगाव प्राथमिक केंद्रशाळेत त्यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली. विविध शाळांत काम करताना शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहे. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या विधानसभेत विशेष दिव्यांग बूथ केंद्रावर तळणी (ता. शेवगाव ) येथे केंद्राध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. या पुरस्काराबद्दल गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ, बोधेगावचे उपक्रमशील विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर, केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलघर, हातगावचे सरपंच अरूण मातंग, उपसरपंच नंदा बर्गे, अक्षय गिरी, ज्ञानदेव अभंग, प्राथमिक शिक्षक बॅंकेचे उपाध्यक्ष रमेश गोरे यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. तसेच शाळेतील शिक्षक बाळासाहेब वाघुंबरे, एकनाथ घुगे, संजय भालेकर, अंबादास कांबळे, संजीवन शेलार, हरिभाऊ सरदार आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अँक्टिव्ह मराठी न्यूज. शेवगाव.







